पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९५
गांधीवाद व लोकसत्ता

अंतच होय, म्हणून लोकशाहीसाठी विकेंद्रीकरण अवश्य आहे, असें या पक्षाचे म्हणणे आहे. या म्हणण्यांत एक फार मोठा हेत्वाभास आहे.
 आज रशियामध्यें समाजवादाच्या नांवाखालीं अत्यंत अनियंत्रित अशी दंडसत्ता प्रस्थापित झालेली आहे. तिच्याकडे बोट दाखवून महायंत्रोत्पादनावर आक्षेप घेण्यांत येतो. भांडवलशाहीमध्ये जे कारखाने व जें धन कांहीं कंपन्यांच्या हातीं असते ते कारखाने व ते धन नव्या व्यवस्थेत सरकारच्या हातीं जाईल; पण यामुळे फरक कांहींच होत नाहीं. अल्पसंख्यांच्या हाती सत्ता केन्द्रीत व्हावयाची ती होतेच. कारण सरकार म्हणजे तरी एक दहापांच व्यक्तींचे मंडळच होय. त्याच्या हाती सत्ता गेली, की ते भांडवलदाराप्रमाणे धन व सत्ता यांच्या लोभानें प्रजेचे शोषण करणारच. यामुळे भांडवलशाही व समाजवाद यांच्यांत कांहींच फरक रहात नाहीं, असा ग्रामवादाचा आक्षेप आहे. लोकमत जेथे अजागृत आहे, असंघटित आहे, सरकारच्या निग्रानुग्रहास असमर्थ आहे, तेथें राष्ट्रीयीकरणाचा हा परिणाम होईल हे खरें; पण अशा समाजांत लोकशाही आहे किंवा तो समाज लोकशाहीस पात्र आहे, असें कोणीच म्हणत नाहीं. पण जे समाजवाद प्रस्थापित करूं पहातात, ते लोकमत जागृत करण्याचे विश्वप्रयत्न केले पाहिजेत याच मताचे आहेत. आणि जेथे लोकमत जागृत, संघटित व प्रभावी आहे तेथें यंत्राचें, उद्योगाचें व धनाचे कितीहि केन्द्रीकरण झाले तरी सत्तेचें केन्द्रीकरण होणे शक्य नाहीं. ब्रिटनमध्ये आपले सत्ताधीश जुलमी आहेत, नालायक आहेत, कर्तृत्वशून्य आहेत असे दिसतांच तेथील जागृत जनता त्यांना तत्काळ पदच्युत करते. अशा जनतेला कारखान्यांच्या व्यवस्थापकांना सहज वेसण घालतां येईल. गांधीवादाला हे म्हणणें या ठिकाणीं मान्य नसले तरी अन्यत्र मान्य आहे. जमीनदार व भांडवलदार यांचें धन एकदम हिरावून न घेतां त्यांना विश्वस्ताप्रमाणे त्याचा वापर करण्यास सांगावे असे ग्रामवाद म्हणतो व जागृत लोकमताच्या बळावर त्यांना तसे करण्यास भाग पाडतां येईल, असा विश्वास बाळगतो. हाच विश्वास समाजवादाने बाळगला तर वास्तविक ग्रामवादाने त्यावर आक्षेप घेऊं नये. "पण ग्रामवादानें अज्ञानानें तसा घेतला आहे. पण तो अगदीं फोल आहे. रशियांत उद्योगधंदे राष्ट्राच्या म्हणजे सरकारच्या मालकीचे होतांच