पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८९
गांधीवाद व लोकसत्ता

वर्गातील असंख्य लोकांना मुसलमान व्हावे लागले. मुसलमान हिंदूंचे कायदे मानीत नसत. कुराणांतील कायदे चालवीत. आमचे राष्ट्र दिवसें-दिवस अज्ञानपंकांत मग्न होत गेले. मुसलमानांच्या येवढ्या मोठ्या कालांत लोकसौख्यकारक कारभाराची उन्नति झाली नाहीं. एकंदरीत मुसलमानी राज्याला लष्करी जोराशिवाय चिरस्थायिकतेचें दुसरे बंधन नव्हते. मुसलमानांच्या एकंदर कर्तबगारीचा विचार करतां त्यांच्याविषयीं अंतःकरणांत खेद होतो. हिंदुस्थानांत नवीन ज्ञानवृद्धि तर दूरच, पण असलेली सुधारणा व ज्ञान यांचा झपाट्याने ऱ्हास होत चालला होता. या भयंकर आक्रमणास तोंड देण्याचे सामर्थ्य हिंदूंत राहिले नव्हते. उत्तरेंत हिंदूचे स्वत्व सर्वथैव नष्ट होऊन त्यांचे मन पूर्णपणे मुसलमानांच्या कबजांत गेलें होतें. राज्य करण्याची योग्यता हिंदूंची नाहीं अशा प्रकारचा सामान्य जनांचा ग्रह होऊन बसला होता. राज्य परकीयांनी करावे व आम्ही त्यांस सर्वस्व मदत करावी असा लोकांचा समज कायमचा बनला.
 ही इतिहासप्रसिद्ध वस्तुस्थिति ध्यानांत येऊन आपण आपली ती भक्कम ग्रामव्यवस्था, ते अभंग शेतकरी जीवन व तीं प्रजासत्ताकें यांचा विचार केला पाहिजे. धर्म गेला, स्वत्व गेले, परकीय कायदे लादले गेले, जिझिया कर देण्याची ऐपत नाहीं, आम्ही राज्य करण्यास लायक नाही ही भावना दृढमूल झाली; तरी शेतकरीजीवन अभंगच ! वरचेवर कत्तली होत, गांवें बेचिराख होत, लोकांना गुलाम म्हणून विकीत; तरी आमची ती ग्रामव्यवस्था भक्कमच राहिली. राज्य लष्करी जोरावर चाललेले, आणि या आपत्ती निवारण करण्यास आम्ही पूर्ण असमर्थ झालेले; तरी आमच्या ग्रामांत प्रजासत्ताकें नांदत होतीं; व्यक्तिविकासास अवसर होता; आणि शेतकरी समाज अजिंक्य होता ! धर्म गेला, राज्य गेले, स्त्री गेली, धन गेले तरी शेतकरी समाज अजिंक्य होता आणि तो प्रजासत्ताकें चालवीत होता ! सरदेसाई, कुमाराप्पा यांच्या मनांत 'प्रजासत्ताकें' या शब्दाचा अर्थ तरी काय आहे ? खरोखर व्यक्तिविकास, प्रजासत्ताक, लोकशाही या शब्दांची ही शुद्ध विटंबना आहे.
 माणूस एखाद्या तत्त्वज्ञानाच्या आहारी गेला म्हणजे तो तें सिद्ध करण्या-