पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१६९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१६८
भारतीय लोकसत्ता

ज्या मनुष्याला कळत नाहीं, तो मनानें कर्धीहि स्वतंत्र होऊ शकणार नाहीं. त्याचें मन कायम गुलामच रहाणार. भूकंप, ज्वालामुखी, ग्रहणें, धूमकेतु, वादळें, अतिवृष्टि, अनावृष्टि, भरती, ओहोटी, चंद्रसूर्यांची खळीं यांमुळे अज्ञानी माणूस भिऊन जातो व या घटनांची खरीखोटी कारणमीमांसा जो कोणी सांगेल त्याचा तो दास होऊन बसतो. मग तो गुरु सांगेल ती व्रते तो आचरतो, त्याच्या कोणच्याहि वचनावर श्रद्धा ठेवतो आणि आपला विवेक व बुद्धि सर्वस्वी त्याला विकून टाकतो. या निसर्गशक्तीच्या अज्ञानांतून ज्यानें मानवाला सोडविले ते भौतिक ज्ञान हाच लोकशाहीचा खरा आधार होय. अत्यंत खेदाची गोष्ट ही की, गांधीवादानें ज्ञानाची ही महती जाणलेली नाहीं. २६-१-४७ च्या हरिजनमधील आपल्या एका लेखांत इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीविषय डॉ. जे. सी. कुमाराप्पा यांनीं विवेचन केले आहे. त्यांच्या मतें इंग्लंडचें खरें वैभव या क्रांतीपूर्वीच्या काळी दृष्टीस पडतें, क्रांतीनंतरची जी व्हिक्टोरिया राणीची कारकीर्द ती म्हणजे ब्रिटनचें तमोयुग होय. क्रांतीपूर्वीच्या वैभवाचीं प्रमाणे म्हणून, त्यांनी शेक्सपीयर, मिल्टन, जोशा-रेनाल्डस्, ख्रिस्तोफर रेन, लॅटिमर यांची उदाहरणे दिली आहेत. आश्चर्याची गोष्ट अशी की, यांत बेकन आणि न्यूटन यांची नांवें नाहींत. ते भौतिक शास्त्राचे आद्यगुरु असून त्यांना अर्वाचीन युरोपचे जनक समजतात. पण कुमाराप्पांच्या मतें इंग्लंडच्या वैभवांत त्यांना स्थान नाहीं ! आणि हा अनुल्लेख सहजासहज झालेला नाहीं. व्हिक्टोरियाच्या कारकीर्दीत फॅरडे, डार्विन, सिम्सन, लीस्टर, केल्व्हिन, हक्सले, रूदर फोर्ड हे जगविख्यात शास्त्रज्ञ होऊन गेले. मिल्, स्पेन्सर, सिडने बेब् यांसारखे पंडित होऊन गेले. तरी तो काळ कुमाराप्पांच्या मते तमोयुगाचा आहे ! कुमाराप्पा हे आज गांधीवादाचे एक प्रधान पुरस्कर्ते आहेत.
 शास्त्रीय ज्ञानाच्या अभावीं मानवी मन गुलामगिरींतून मुक्त होणें कठिण आहे आणि त्या मुक्ततेवांचून त्याला व्यक्तित्वाची रग प्राप्त होणे अशक्य आहे. हा माणूस नेहम नेभळा, भाबडा, अडाणी, भोळसट असाच रहाणार. त्याला लोकायत्त शासन पेलण्याचें सामर्थ्य कधींहि येणार नाहीं. गांधीवादामध्ये सत्य व नीति यांना फार महत्त्व आहे. पण आपण हे विसरतों की,