पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१४४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१४३
जनता जागृति

समाज हळूहळू प्रबुद्ध झाला, संघटित झाला आणि ब्रिटिशांचे राज्य नष्ट करण्यासाठी आत्मबलिदान करण्यास सिद्ध झाला, हे कल्पनातीत असे परिवर्तन होय. सत्याग्रहाने केलेला हृदयपालट तो हाच. हा दुसऱ्या कोणच्याहि मार्गाने झाला नसता. दहशतवादाने सर्व देशभर तीव्र अहंकाराची जाणीव उमटून जाते, नाहीं असें नाहीं. पण ती क्षणभरच; आणि त्याची प्रतिक्रिया फार भयंकर स्वरूपाची असते. सरकार आपल्या सर्व आसुरी सामर्थ्यानिशी दहशतवादी तरुणांचे निर्दाळण करते व तें पाहून जनता जास्तच भयग्रस्त होऊन चिडीचीप होऊन जाते. त्यापेक्षांहि दहशतवादाचे मोठे वैगुण्य म्हणजे तो मार्ग आपला नव्हे, त्याशीं आपला कांहीं संबंध नाहीं, अशीच जनतेची त्याविषयींची भावना असते. तो मार्ग अत्यंत अल्पसंख्यांचा आहे. जनता जागृतीचे, सुप्त लोकशक्तीला आवाहन करण्याचे उद्दिष्ट त्याने साधत नाहीं. सरदारवर्गाच्या किंवा लष्कराच्या साह्याने क्रांन्ति घडविणे हा दुसरा मार्ग, त्याचा विचार आपण मागें केलाच आहे. जर्मनी, इटली, स्पेन यांनी तो अंगीकारला आणि त्यामुळे तेथील सत्ता कायमच्या लोकविन्मुख राहिल्या. त्या मार्गांतहि सर्वांना सहभागी होतां येत नसल्यामुळे, सर्वांच्या शक्तीला आवाहन नसल्यामुळे, लोकसत्तेच्या प्रगतीच्या दृष्टीनें त्याचे महत्त्व अल्प आहे. सत्याग्रहाचे स्वरूप याहून निराळे आहे. त्याचा पहिला मोठा गुण म्हणजे त्यांत बहुसंख्य लोकांना सहभागी होतां येते. यातना, हाल, देहदंड यांच्या दृष्टीने पहातां हा मार्ग इतर मार्गापेक्षां सोपा आहे. सुसाध्य आहे. पण याचें फल मात्र फार मोठे आहे. कोणचेंहि राजशासन जनतेची कळत वा नकळत संमति असल्यावांचून टिकूं शकत नाहीं हा राज्यशास्त्राचा सिद्धांत आहे. सत्याग्रहाने जनतेची संमति हा जो शासनाचा मूलाधार तोच उखडला जातो. प्रारंभी अगदीं अल्पसंख्य लोक जरी चळवळींत असले तरी हळूहळू हा असंतोष, हा क्षोभ, ही जागृति पसरत जाते व शेवटी या लाटा सैन्यापर्यंत पोचतात आणि सैन्यानें राजसत्तेची सेवा करण्यास नकार देणें ही सत्याग्रहाच्या वा निःशस्त्र- प्रतिकाराच्या चळवळीची परिणति होय. कायदेभंग व करबंदी यांचे या लोकजागृतीच्या दृष्टीने महत्त्व आहे. चार पोतीं मीठ लोकांनी नेलें, किंवा एकाद्या जिल्ह्यांतील लोकांनी एखाद्या वर्षी सरकारसारा दिला नाहीं, तरी