पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१४२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१४१
जनता जागृति

अनुसरून नसल्यास तीपासून कधींहि फायदा होणार नाहीं; फार काय पण राजकीय शिक्षा लोकमतावरच अवलंबून असते. आपण जर उद्यां तुरुंगांत जाणें ही शिक्षा आहे असे मानले नाहीं तर राजकीय शिक्षेचा उपयोग काय होणार ? लोक आनंदाने तुरुंगांत जातील.' असे टिळकांनी १८८१ साली लिहून ठेविले होते. महात्माजींनी टिळकांचे ते दिव्य स्वप्न प्रत्यक्षांत आणले; आणि 'सार्वलौकिक मत म्हणून जो एक नियामक अद्भुत उपाय आहे- ज्याला जुलमी राजे व अहंपणाचा तोरा बाळगणारे मंत्रीहि भितात '- (केसरी १८८२) तो नियामक उपाय, ते सार्वलौकिक मत या देशांत निर्माण करण्यास प्रारंभ केला. चंपारण्य व खेडा येथील लढा हा शेतकऱ्यांचा लढा होता. अहमदाबादला महात्माजींनी कामगारांचा प्रश्न हातीं घेऊन त्यांनाहि आपल्या प्रभावी शस्त्राचा परिचय करून दिला. या दोनतीन लढ्यांनीं भावी संग्रामांतील प्रास्ताविक घटना संपल्या आणि १९१९ साली रौलेट बिलाविरुद्ध महात्माजींनी जी सत्याग्रहाची चळवळ सुरू केली तिला एकदम अखिल भारतीय रूप प्राप्त झाले.
 भारतीय स्वातंत्र्याचा लढा चालविण्यासाठी गांधीजींनी शांततामय सत्याग्रहाच्या मार्गाचा अवलंब केला. यासाठी ही भरतभूमीच केवळ नव्हे तर सर्वं जग त्यांचें कायमचें ऋणी राहील. या मार्गाची कांहींशीं कल्पना टॉलस्टॉय यांनी सांगितली होती. हंगेरींतील खाणी-कामगारांनी त्याचा एक यशस्वी प्रयोगहि केला होता. पण हिंदुस्थानसारख्या खंडप्राय देशांत, तीस- चाळीस कोटी लोकांच्या समाजांत व स्वातंत्र्यप्राप्तीसारख्या महान् कार्यासाठीं या अस्त्राचा प्रयोग अजून कधींच कोणी केला नव्हता. तो प्रयोग यशस्वी करून भावी काळांतील लोकायत देशांतील संग्रामांना महात्माजींनी कायमचा आदर्श निर्माण करून ठेविला आहे.
 येथे सत्याग्रहाचा विचार त्यांतील कायदेभंग व करबंदी या प्रधान घटकांकडेच फक्त लक्ष ठेवून केला आहे. त्यांतील आत्मबल, प्रतिपक्षाविषयीचे प्रेम, त्यांतील कायावाचामनाची अहिंसा यांचा विचार येथे केलेला नाहीं. अन्यायाचा शांततेनें प्रतिकार करणे, जुलमी सत्तेविरुद्ध निःशस्त्र लढा पुकारून त्या लढ्यांमुळे भोगावे लागणारे सर्व क्लेश, शारिरिक व