पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१२२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१२१
भारतीय लोकसत्तेचा आद्यप्रणेता

पोलीसांनी लाठीहल्ला करून सुरेंन्द्रनाथांना अटक केली व दोनशें रुपये दंड केला. तो भरून ते लगेच मंडपाकडे आले आणि सभा झाल्यावर पुन्हां तोच घोष करीत सभाजन घरोघरी गेले.
 हें वारिसाल प्रकरण म्हणजे निःशस्त्र प्रतिकारांतील पहिला संग्राम होता. पोलीसांनी लाठी चालविली तरी आपण हात उचलावयाचा नाहीं, आपण बरोबर काठी सुद्धां न्यावयाची नाहीं असे सुरेन्द्रनाथांनी लोकांना बजाविले होते. लोकांनी या आज्ञेचे तंतोतंत पालन केलें होतें. चित्तरंजन गुह या विद्यार्थ्याला पोलिसांनी लाठीचे अनेक तडाखे दिले. दर प्रहाराबरोबर तो शांतपणें 'वंदे मातरम्' चा घोष करीत होता. शेवटी पोलीसांनीं त्याला एका तळ्यांत फेंकून दिले. त्यांतून तो कसाबसा वांचून बाहेर येतांच परिषदेच्या मंडपांत आला.
 या प्रसंगाने व पुढे प्रतिपक्षाला उत्तर देण्याच्या निमित्ताने टिळकांनीं आपले कायदेभंगाचे व बहिष्कारयोगाचे सर्व तत्त्वज्ञान सांगून टाकले आहे. त्याचा थोडक्यांत सारांश असा- हिंदुस्थानांत 'सनदशीर चळवळ' या शब्दांना कांहीं एक अर्थ नाहीं. इंग्लंडमध्ये पूर्वकाळीं राजानें प्रजेला अनेक सनदा देऊन प्रजेचे बहुविध हक्क मान्य केलेले आहेत. त्यामुळे त्या सनदांनीं दिलेल्या हक्कांच्या रक्षणासाठी त्या सनदान्वयेंच होणारी जी चळवळ ती सनदशीर चळवळ होय. हिंदुस्थानाला ब्रिटिश सरकारने तशी कसलीहि सनद दिलेली नाहीं. तेव्हां येथे सनदच नाहीं; त्यामुळे सदनशीर चळवळ करतो, असे म्हणणे म्हणजे दूध म्हणून पिठाचें पाणी पिण्यासारखे आहे. (केसरी १२-२ आणि ५-३-१९०७) आतां कायदेशीर शब्दांचा विचार करावयाचा. सरकारचें एखादें कृत्य कायदेशीर असले म्हणजे तें जुलमी नाहीं असें ठरत नाहीं. औरंगजेब बेकायदेशीर कधींच वागला नाहीं. म्हणजे तो जुलमी नव्हता असे म्हणावयाचे कीं काय ? त्याची लहर हाच कायदा असल्यामुळे त्याचे कोणतेहि कृत्य कायदेशीर ठरू शकत होतें. तीच गोष्ट सध्यांच्या सरकारची आहे. चार माणसें टेबलाभोवती जमलीं कीं वाटेल तितके कायदे जन्मास येतात. आतां कोणाच्याहि कृत्यावर सरकारला 'कायदेशीर' असा शिक्का मारतां येतो त्याचप्रमाणे हे कृत्य जुलमी आहे असा त्यावर शिक्का मारण्याचा प्रजेचा हक्क आहे. सरकारला कांहीं विशिष्ट