पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८८ भारतीय रसायनशास्त्री [ प्रकरण नाही. नागार्जुनसमकालीन शालिवाहन राजाच्या बायकोचें नांव चंद्रलेखा असे असून तिला दोन मुले होती. सप्तशतीगाथाकर्ता शालीवहनाची हकीकत देतेवेळीं तो नागार्जुनाचा समकालीन होता असे कोठेही झटलेले नाही. याशिवाय, ज्यांनी आपला शक चालू केला तो एक तिसराच शालिवाहन राजा असून, त्याचा मंत्री शूद्रक व भार्या ( नांव कळत नाहीं ) असावा. याची बायको कोल्हापूरकडच्या कोणी असुराने गीतमोहित करून हरण करून नेली. या प्रकारे तीन शालिवाहनांच्या गोष्टी एकत्र केलेल्या दिसतात. यांचा तपशील आमच्या मते असा दिसतोः= : काल सुमारे इ. स. ५७ ( १ ) सातवाहन हा वायुपुराणांतील तिसरा राजा कृष्णाचा पुत्र शातका हा असावा. हाच बहुधा नागाजुनचा समकालीन असून त्याचा आश्रयदाता असावा. याला चंद्रलेखा स्त्री व दोन मुलगे असावते. उज्जयिनीच्या विक्रमाने दक्षिणदेश जिंकू लागतां यानेच त्याचा पराभव करून, तापनिदीपयतचा उत्तरेकडचा प्रदेश याने आपल्या राज्याला जोडला असावा, या राजापासूनच या वंशांतील राजांना सातवाहन अगर शालवाहन कुलांतल राजे असे झटले असावे. यापुढचे सर्व राजे सातवाहन अगर शालवाहन होत. काल इ. स सुमारे ७८ (२) शालिवाहन याचा मंत्री शूद्रक असावा. याने शकांच पराभव करून शालिवाहन कुळाची कीर्ति वाढविली असावी, व तन्निमित्त याने आपल्या नांवाचा शक चालू केला असावा, याची राणी गीतभोहत होती तिला मायासुराने पळवून नेली. ती शूद्रकाने सोडवून आणली. ( ३ ) सातवाहन-हा गाथासँग्रहकार कुतंलदेशाधिपति पैठणचा राजा असावा. हा कविवत्सल होता याच्या पदरीं शम वर्मा, गुणाढ्य वगैरे कवि होते. ह्याला वोटर्सनच्या प्रतींत 4 शतकणोपनामक द्विापकर्णात्मज