पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३ वें ] सिद्ध नागार्जुन व त्याचे ग्रंथ. प्रभावक चारित्र नामक ग्रंथांत श्रीपादलिप्तसूरीची हकीकत आहे. त्यांत असे सांगितले आहे की महावीरानंतर ४८० वर्षानंतर आर्य खपुटाचार्य (ऊर्फ पादालनाचार्य ) होऊन गेले. श्रीमत् सातवाहन राजा हा ( ? ) तीर्थाला आला होता व तेव्हां तेथे पाइलिपसूरीने ध्वज उभारिला. तसेच त्यावेळी तेथे कालकाचार्याचा भाचा बालमित्र राजाही हजर होता, असे झटले आहे. | या हकीकतवरून कालकाचार्य, पादलित सूरी ऊर्फ खपुटचाय, बालमित्र व मानुभित्र, नागार्जुन, व सातवाहन, हे समकालीन असल्याचे कळून येते. तसेच, उज्जैनाच्या विक्रमादित्याच्या वेळी कोणीतरी एक सातवाहनराजा प्रतिष्ठान येथे राज्य करीत होता, व त्याचाच कलागुरु नागार्जुन होता हेही सिद्ध होते. । तिसरा एक कालकार्य इ. स. ९९३ मध्ये होऊन गेला. आपणांस पहिल्याशीही कांहीं कर्तव्य नाही व तिस-याशीही कर्तव्य नाही. फक्त दुसन्याशी कर्तव्य आहे. जैन ग्रंथकारांच्या ग्रंथांत पैठणच्या शातवाहनांविषयीं ब-याच हकीकत मिळतात. राजशखराच्या चतुर्वशति प्रबंधांत सातवाहन व त्याचा मंत्री शूद्रक यांची गोष्ट वर पं. दीनानाथ यांनी दिल्याप्रमाणे दिली आहे. त्याने एक गाथासंग्रहही केला असे ब-याच ठिकाणी झटले आहे. पं. दीनानाथाच्या मते हा पैठणाचा सातवाहन राजा हालच होय. मेरुतुंगानें जें सातवाहन ऊर्फ शालिवाहनाचे वर्णन ( त्याने गाथासंग्रह केला ह्मणून ) दिले आहे, ते पहातांही हा जैनांचा शालिवाहन ह्मणजे हालच दिसते • याची राणी गीतमोहित असून, तिला एका मायासुराने पळवून नेली होती तिची सुटका शूद्रक मंत्र्याने करून आणिली; पण मेरुतुंगाने शालिवाहन व नागार्जुन या दोघांच्याही हकीकती देतांनां नागार्जुनाचा समकालीन सातवाहन, व गाथासंग्रहकर्ता शालिवाहन एकच असे कोठेही वाटलेलें 1 Dr. Bhau Daji's Literary Remains, p. 126.