पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय रसायनशास्त्र [ प्रकरण चायाच्या सरस्वती नावांच्या बहि गोचा वळाकाराने उपमर्द केल्यामुळे, कालकाचायने शकांकडून त्यास राज्यभ्रष्ट करविलें, शकांनीं उज्जयिनीस ४ वर्षे राज्य केले तोंच गर्दाभल्लाचा पुत्र विक्रमादित्य याने या शकांनां उज्जयिनींतून हांकून लावून आपला विक्रमसंवत् महावीरानतर ( ४५३+१३+४ ) ४७० वर्षानंतर सुरू केला. महावीराचे निवार्ण इ. पू. ५२७ वर्षी झाले हे अनेक पुराव्यांवरून सिद्ध होते. महावीरानंतर ४७० ह्मणजे इ. पू. ९७ होते. तेव्हां कालाचार्य इ. पू. ७४ ते ५७ पर्यंत व पुढेही थोडा काळपर्यंत होते हैं जैन ग्रंथावरून कळून येते. । डॉ. भाऊ दाजींनीं (पृ. १२०मध्यें ) कालीकाचार्यांची स्वतंत्र हकीकत दिलेली आहे. तींतही वर दिलेली हकीकत असून शकराज्याची स्थापना उज्जैनसि केल्यानंतर पुढे कालकाचार्याने काय केलें हेही दिलेले आहे. शक राजे इ. पू. ६१ च्या सुमारास हिंदुस्थानांत शिरले हे वर दिलेलेच आहे। त्यावेळी लाट देशांतील भडोच शहरांत बालमित्र व भानुमत्र हे राजे राज्य करीत होते. हे कालकाचार्याचे भाचे होते. शकराजांनी यांचेही सहाय्य घेऊन उज्जयिनी शहर घेतले. याप्रमाणे उज्जयिनीत इ. पू. ६१ मध्ये शकांचा अंमल चालू झाल्यानंतर आपल्या भाच्याबरोबर कालकाचार्य भडोच येथे गेले. तेथे राजपुरोहिताचा व यांचा तंटा होऊन, राजपुरोहित महाराष्ट्रदेशांतलि प्रतिष्ठानचा राजा ज्ञातवादन याच्या पदरीं जाऊन राहिला. कालकाचार्यने पर्युषणापवाची तिथि ठरविली वगैरे हकीकत आहे. एका मारवाडी पुस्तकांत एक गाथा अशी आहे की, कालकसरी दोघे झाले. पहिल्यास श्यामार्जुन असेही झणत असून तो महावीरानंतर ३३५ वर्षांनंतर झाला; व दुसरा कालकरी हा आपल्या सरस्वती बहिणाला गर्दभिल्लाच्या रंगमहालांतून सोडविता झाला. हा महावीरानंतर ४२३ वर्षांनी झाला.