पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

t. --- १३ वें ] सिद्धनागार्जुन व त्याचे ग्रंथ. ७७ इ. स. १०० च्या पूर्वी तांत्रिक व इतर परंपरेचे ग्रंथ निपजले होते हैं। यावरून कळून येईल, आतां नागार्जुनाचे रसरत्नाकराविषयींच विशेषेकरून विचार करूं। । । ३ । रसरत्नाकर ( बगाचा ) नागार्जुन कोण होता, तो कवी होऊन गेला, व त्याने कोणकोणते ग्रंथ लिहिले, याविषयी माहिती दिलेलीच आहे. आता त्याच्या रसरत्नाकराची जी एक प्रत मिळाली आहे तीविषयी थोडीशी अधिक माहिती देतो. रसरत्नाकर ग्रंथ एक नित्यनाथाचा आहे; व दुसरा नागार्जुनाचा आहे. हे अगदी भिन्न ग्रंथ आहेत, नागार्जुनाचा ग्रंथ एकंदर ६७० श्लोकांचा आहे. यांत रसविद्या व रसायनविद्या झणजे लोहसिद्धि देहसिडी हे दोन्ही विषय अगदी उत्तम तन्हेनें वार्णलेले आहेत; नागार्जुन हा भारतीय रसवेत्यांमध्ये एक अपूर्व सिद्ध होऊन गेला. रसरत्नसमुच्चयकर्त्याने याची २७ रससिद्धांत गणना केलेली असून, याच्या ग्रंथांतून अनेक उतारे घेतलेले आहेत. नागार्जुनाने आपल्यापेक्षाही प्राचीनतर अशा कांहीं ग्रंथकारांचा उल्लेख केलेला आहे, तो ऐतिहासीक दृष्ट्या अत्यंत उपयोगी व महत्वाचा आहे नागवोध अगर नागवुद्धि याचा त्याने दोन ठिकाणी असा उल्लेख केलेला आहे:.... (१) शुद्धः स भवेत्सारणविधि नबोधकृतः॥ ३९४ ॥ (२) दारिद्यार्णवमग्ना सत्वं द्विष्ट्वा (?) द्विपंचविंशतिकम् ॥ करुणावेशितप्रतिमान् कनकर नागबुढ्यैतत् ॥ ४१५ ॥ नागार्जुनाने नागबोध अगर नागबुद्धि याचा सारणविधि दिलेला आहे: नागार्जुन त्यास फार पूज्य मानीत आहे. यावरून नागबोध हा नागर्जुनाचा शिष्य नसून कोणी तरी नागार्जुनाहून प्राचीनतर ग्रंथकार. आहे हे सिद्ध होते. या नागबाधीची गणता र. र. स. काराने रससिद्धांत केलेली आहे. | नागार्जुनाने आपणांस रससिद्धी कशी मिळाली, याची हकीकत आपल्या ग्रंथांत दिलेली आहे, ही मोठी अपूर्व गोष्ठ होय, शास्त्रीय ग्रंथांत