पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय रसायनशास्त्र, [ प्रकरण असली, तरी वरील श्लोक ३८७ मध्ये मात्र प्रा. रॉय व आमच्यादोघांच्याही प्रतीत * प्रणिपत्य सर्व बुद्धान्' असे स्पष्ट आहे तसेच यांत नागबुद्धि अगर नागबोधि या बौद्ध परंपरेच्या ग्रंथकारांचे उतारही दिलेले आहेत. त्याचे पुढे वर्णन आहेच. असो. या एकंदर विवेचनाचा । मथितार्थ एवढाच की, रसविद्या प्राप्त झाली तेव्हां नागार्जुनाने बौद्ध धर्म स्वीकारला होता हेच बहुधा संभवनीय दिसते. नागार्जुनाने नानाशास्त्रांचा अभ्यास नाना तांत्रिक व वैदिक परंपरांवरून केलेला होता, यांत शंकाच दिसत नाहीं; कारण त्यानें कक्षपुटींत झटले आहे कीः-- सँसारे बहु विस्तीर्णे विद्यासिद्धिमनेकधा ।। प्रोक्तवान् शंकरः शीघ्रं यदएच्छत पार्वती ॥ १ ।। अन्यै देवगणैः सिद्वैः सुनिभिः साधकोत्तमैः ।। यद्यदुक्तं हि शास्त्रेषु तत्सर्वमवृलोकितं ॥ २ ॥ शांभवे यामले शाके मौले कौलेय डामरे। स्वच्छंदे नाकुले शैवे राजतंत्रेऽमृतेश्वरे ॥ ३ ॥ उड्डीशे वातुले तंत्रे उच्छिष्टे सिद्वशाबरे। किंकणी मेलतंचेच काकचंडीश्वरीमते ।। ४ ।। शाकिनी डाकिनीतंत्रे रौदेऽनुग्रह विग्रहे ।। कौतुके शक्तितंत्रे च निराकार गुणोत्तरे ॥ ५ ॥ हरमेखलके तंत्रे इंद्रजाले रसाणचे । आथर्वण महावदे चार्वाक गारुडेऽपिच ॥ ६ ॥ इत्येवमागमप्रोक्तं चकाद्वकेण यच्छ्रतं । तत्सर्वं हि समुधृत्य दग्धे। घुम्पिवादात् ॥ ७ ॥ साधकानां हिगथय मंत्रसंड मिहोच्यते । यावरून शैव व इतर परंपरेचे आगम व तंत्रग्रंथ, सिद्धांचे ग्रथं मुनींचे ग्रंथ, साधकांचे ग्रंथ, नांवाने उल्लेखिलेलीं तंत्रे ही सर्व आगमोक्त माहिती, व तोंडच्या परंपरेने मिळालेली माहिती या सर्वांवरून दह्यापासन लोणी काढितात तशी नागार्जुनाने माहिती काढून तयार केलेली । आहे, यावरून नागार्जुन हा जवरा शोधक व मोठा संग्रही होता हे कळून येईल, त्याने नाना परंपरांवरून विद्यांचा संग्रह केला होता.