पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३ वे ] । सिद्धनागार्जुन व त्याचे ग्रंथ, व मर्गाने पारीक्षित जनमेजयास सांगितलेले रतिशास्त्र याच दान प्राचीन ग्रंथांचा उल्लेख असून, नागार्जुन श्रीपर्वतावर असतेवेळी तंडिन् । नामक शिष्यास त्याने हे रतिशास्त्र सांगितलें असे त्यावरून कळून येते यांत शिवा विषयीं नागार्जुनाची फार पूज्य बुद्धी दिसून येते, तेव्हां हाही ग्रंथ शैव परंपरा कायम असतेवेळींच नागार्जुनाने लिहिला असेच मानावे लागते. आतां रहातां राहिला रस रत्नाकर. यांत मात्र बौद्ध परंपरेची कर्त्यांच्या मनावर छाया पडलेली दिसून येते. त्याने श्लोक ३८७ मध्ये लिहिले आहे कीं :- प्राणिपत्यसर्वबुद्धान्.........सकलदोषावनिर्मुक्तान्। वृक्ष्य सर्वहितार्थ कक्षापुटं सर्वसिद्धिकरं ॥ ३८७ ॥ । पहिल्या चरणांतील काही भाग हस्तालाखत प्रतीत नाहीं, येथे सर्व बुद्धांनां स्पष्ट नमन आहे, तसेच दुसन्या एका ठिकाणी ' प्रज्ञापारमिता नामक एका बौद्ध परंपरेच्या देवतेच्या स्वप्नांतील स्फूर्तीने ( दृष्टांतानें ) आपणांस अमुक एक प्रयोग समजला असे रसरत्नाकरांत झटले आहे. मात्र या श्लोकाचा आमच्या प्रतीतील पाठ व प्रो. रायच्या प्रतीतील पाठ मात्र भिन्न आहेत, ते दोन्ही येथे देतों आमच्या प्रतींतील पाठ. प्रज्ञायां तु मृडा निशीथसमये स्वप्न प्रसादीकृतं । नाम्ना तीक्ष्णमुखं रसेंद्रसमले नागार्जुनपादितं ॥ ८६ । प्रो. रायच्या प्रतींतील पाठ. (उतारे पृ. १० पहा ) प्रज्ञापारमिता निशीथसमये स्वप्ने प्रसादीकृतं ।। नाम्ना तीक्ष्णमुखं रसदममलं नागार्जुनप्रोदितं ॥ या पाठभेदांत * प्रज्ञायां तु मृडा' असा एक पाठ आहे, व * प्रज्ञापार. मिता' असा एक पाठ आहे. पहिल्या पाठाने • शिवाने बुद्धींत रात्रीं स्वप्नांत प्रेरणा केली असा अर्थ निघते व दुसन्य पाठाने * प्रज्ञापारामतेने रात्रौ। स्वप्नांत प्रेरणा केला असा अर्थ निघतो. तेव्हां एथे शंका आली. मूळचा पाठ कोणता कोणास माहीत ? या पाठांत जरी शंका असली, व त्यामुळे * शिव' की प्रज्ञापारमिता' देवता त्यांत उद्दिष्ट आहे याची जरी शंका