पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७४ भारतीय रसायन शास्त्र. [ प्रकरणे बाकीचे ग्रंथ अझून पहाण्यासही मिळत नाहीत. वर दिलेल्या उपलब्ध अशा ४ ग्रंथांवरून पहातां देखील मागील धर्ममतांच्या फरकीची छाया त्यांपैकी शेवटच्या ग्रंथांतच तेवढी दिसून येते, कारण तोच फक्त रसविघेवरील ग्रंथ आहे. कक्षपुटींत व आश्चर्ययोगरत्नमालेत केवळ तंत्रशास्त्राचाच विषय असून शैव परंपरेच्या अनेक तंत्रांतूनच नागार्जुनाने हे विषय घेतलेले आहेत. त्यावेळी त्याच्या मनावर इतर मतांची छाया पडलेली दिसून येत नाहीं. कक्षपुटीत आकाशगमनविद्येवर कांहीं भाग आहे, पण जैनधर्मीया पगडा त्याच्या मनावर बसलेला कोठे दिसून येत नाहीं. सारे । मैत्र व सा-या देवता वगैरे केवळ शैव तांत्रिक परंपरेच्याच आहेत, कक्षपुटी लिहिल्या तेव्हां नागार्जुनाला रसविद्येची माहिती नव्हती असे मानण्यास एक कारण आहे. ते असे की, प्रारंभी त्याने रसाव ग्रंथांचा उल्लेख केलेला असूनही रसशास्त्रावरील एकही प्रयोग त्याने आपल्या ग्रंयांत दिलेला नाहीं; निदान कलकत्ता व बेळगांव येथे छापलेल्या कक्षपुटीच्या दोन्ही प्रतीत रसाणवीतील एकही रसविधेचा प्रयोग नाहीं. यावरून त्यावेळी नागार्जुनास ‘रसार्णव' हा शैव तांत्रिक परंपरेचा ॐ केवळ क्षेत्रग्रंथ ह्मणूनच महत्वाचा वाटला असावा; रसग्रंथ ह्मणून सविवरचा ग्रंथ ह्मणूनच वाटला नसावा, हे एक; किंवा कक्षपुटी सध्या मिळत आहे तशी, अपूर्ण तरी असली पाहिजे हे एक; पण ग्रंथरचनेवरून पहातां कक्षपुटी अपूर्ण असल्याप्रमाणे दिसत नाही, यावरून पहिलेच अनुमान खरे ठरण्याचा संभव अधिक आहे. मग, रसा व ग्रंथाच्या प्रस्तावनेत नागार्जुनाने उल्लेख केला असून पुढे सबंध ग्रंथांत यांतील रसविद्येवरील एकही प्रयोगाचा उतारा नाही, हे कसे झाले असावे ? यावरून त्यावेळी त्याच्या मनाची या विद्येकडे प्रवृत्ति झाली नसावी व त्यास तिचा अनुभव आला नसावा, असेच मानावे लागते. या दोन्ही ग्रंथांच्या रचनेच्या वेळी नागार्जुन पूर्ण शैव होता असेच मानावे लागते. तिसरा ग्रंथ रतिशास्त्र' यांत 'शिवक्तरतिशास्त्र ?