पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७३ १३ वै] सिद्धनागार्जुन व त्याचे ग्रंथ. गुरूकडे त्याने अध्ययन केले व नंतर भूतदयेच्या मूर्तिमंत तत्वाकरिता त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणे त्याने बौद्धधर्म स्वीकारिला, व बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर त्याचे रसवियेकडे लक्ष गेले, असे वरील हकीकतीवरून सिद्धांत निघतात. नागार्जुनाच्या धमतरांविषयी व धर्ममतांविषयी एवढी माहिती मिळते. त्या त्या काळच्या धर्ममतांची छाप त्याच्या त्या त्या ग्रंथांत असलेली दिसून येते. त्याचा कक्षपुटी ग्रंथ जर पाहिला, तर तो पूर्ण तांत्रिक स्वरूपाचा असून प्रारंभीं नमन शंकरासच आहे; हा ग्रंथ केवळ तंत्रशास्त्राचा असून आरंभीं अनेक ब्राह्मण परंपरेच्या तंत्रग्रंथांचा उल्लेख आहे. यांत आकाशगमन विद्येचाही भाग आहे. यावरून हा ग्रंथ नागाजुनाने ब्राह्मणधर्मात असतांनाच, पण आकाशगमन विद्या प्राप्त करून घेतल्यानंतर लिहिला असावा असे अनुमान निघते. यावरून दुसरें एक असे समजून येतें कीं नागार्जुनाने बहुधा जैन धर्माचा केव्हांच स्वीकार केला नसून, फक्त आकाशगमनविद्या मिळविण्यासाठी तेवढेच त्याने पादलिप्ताचार्याजवळ अध्ययन केले असावे. जरी धर्मदीक्षा त्याने घेतली असली तरी विद्याप्राप्ती पुरतीच ती घेतली असावी; वास्तविक रीत्या त्याच्या मनाचा कल कांही जैन धर्माच्या मतांकडे नसावा. नागार्जु. नाचे मनाचा कल बौद्धधर्माकडेच पुढे वळला. बौद्ध धर्माची दीक्षा घेतत्यानंतरच याचे लक्ष रसावंद्येकडे लागले असावे, या सिद्धांतास देखील त्याच्या रसविद्येवरील ग्रंथावरून पुष्टीकरण मिळते. नागार्जुनाचे एकंदर तीन ग्रंथ छापलेले आहेत; व एक ग्रंथ मला हस्तलिखित प्रतीच्या रूपाने उपलब्ध झालेला आहे. छापील ग्रंथ, हस्तलिखित. नागार्जुन कक्षपुटी, आश्चर्ययोगरत्नमाला. वैसरत्नाकर रात शास्त्र, ।