पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

। १३ वे ] सिद्ध नागार्जुन व त्याचे ग्रंथ. लागलें, ज्या मानाने ज्याची कळकळ असते त्या मानाने त्याजकडून क्रिया घडत असते, या महासिद्धांताप्रमाणे, नागार्जुनाचे लक्ष याविषयाकडे दिवसेंदिवस अधिकाधिकच वेधत गेले. त्याने रसविद्या पैदा करण्यासाठी हिंदीमहासागरांतील एका बेटांत एक रससिड होता त्याजकडे गमन केले. समुद्राचे उल्लंघन करणे कोणत्याही साधारण उपायांनी शक्य नसल्यामुळे त्याने आकाशगमनाच्या कांहीं प्रयोगाने एका झाडाची दोनपाने आपल्या पायांस लावून, आकाशमार्गाने त्या सिद्धाकडे गमन केले. त्या सिद्धान्त तथे हा मानवी प्राणी कसा आला याचे मोठे आश्चर्य वाटू लागले. नंतर नागार्जुनाने आपण त्या पानांच्या योगे कसे आलों, हें निवेदन केले. नागार्जुनाने ती दोन्ही पाने न दाखवितां एक पान लपवून ठेविलें होते. त्याचा पुढे उपयोग झाला. त्या सिद्धाच्या मनांत ही विद्या जंबुद्वीपांतील भानवांना कळू नये असे असल्यामुळे, ते पान आपणांस दिल्यास आपण ही विद्या तुला शिकवं ह्मणून त्याने नागार्जुस सांगितले. नागार्जुनाने परत जाण्याकरितां एक पान भिक्षच्या शाटत लपवूनच ठेविले होते, ह्मणन ती अट कबूल केली. सिद्धाने ते पान त्याजकडून मागून घेण्यांत त्याचा एवढाच उद्देश होता की, नागार्जुनास तेथेच अडकवून ठेवावे; पण नागार्जुन त्याहूनही वस्ताद. त्याने ती विद्या त्या सिद्धाकडून पैदा करून त्या महासागरांतील बेटांतून जंबूद्वीपाकडे ( हिंदुस्थानाकडे ) पुनरपि आकाशमार्गाने गमन केले. या वेळी ते दुसरे पान अर्थात उपयोगी पडले. नालंदच्या विहारास येऊन रससिद्धीच्या योगाने त्याने सर्व भिक्षुचे यथायोग्य पोषण केले, त्याने या विद्येमुळे व इतर तपा” सिद्धि मिळविल्या. नालंदच्या भिनां त्यांनी बौद्धधर्माची तत्वे चांगली शिकविलीं. नागार्जुनाने उत्तर कुरु देशाकडे जाऊन तेथे अनेक चैत्यें व आलये स्थापिली. त्याने विविधशाखें वैद्यक, ज्योतिष, व रसविद्या यांवर अनेक ग्रंथ लिहिले. सरहभद्राच्या मरणानंतर नालंदच्या विहाराचे आधिपत्य साहजिकच याच्याकडे आले. ही कामगिरी त्यांने चोख बजावली, सरहभद्राकडून प्राप्त झालेल्या माध्य