पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७० भारतीय रसायनशास्त्र, [ प्रकरण वेळी, फार सूक्ष्मतहेर्ने निरीक्षण केले पाहिजे तारानाथाचा इतिहास व इतर तिबेटी साधने यांवरून थोडक्यांत बौद्धपरंपरेप्रमाणे सिद्ध नागार्जुनीचें चरित्र असे असल्याचे कळून येतेः-- । “विदर्भ देशांतील एका श्रीमान ब्राह्मणास पुष्कळ वर्षे पर्यंत मुलगा झालेला नव्हता. त्याला एके दिवशी असा दृष्टांत झाला की १०० ब्राह्मणांना भोजन घालून त्यांस दाने दिल्याने तुला पुत्र होईल. त्याप्रमाणे त्याने केलें; व पुढे दहा महिन्यांनी त्यास मुलगा झाला. नंतर त्याचे जातक वर्तविण्यासाठी त्याचा बाप ज्योतिष्यांकडे गेला; त्यांत असे निघालें की ते बालक एका आठवड्यावर जगणार नाही. मग ते मूल अधिक जगण्याचा उपाय ह्मणून ज्योतिषांनी १०० भिक्षूनां त्याचप्रमाणे भोजनादि उपचार करण्यास सुचविलें यायोगे फक्त सातच वर्षे मुलगा जगेल असे त्यांनी सांगितले. सातव्या वर्षाच्या अखेरीस आईबापांनां त्याजबद्दल अत्यंत हुरहुर वाटु लागली. त्याचे मरण आपल्या समोर घडलेले त्यांजकडून न पाहवल्यामुळे, त्या मुलांच्या शुश्रूषेस माणसे देउन त्यांनी त्याची दुसरीकडे रवानगी केली. तो मुलगा अशा त-हेने आपले दिवस दुःखांत कंठीत असतां, एके दिवशीं महाबोधिसत्व अवलोकितेश्वर खसर्पण याने गुप्तरू. पाने त्यास दर्शन दिले व ‘जमका अजब तडाख्यां' तून सुटावयाचे असेल तर तू मगधदेशांतील नालेंद्र ( नालंद ) यथील महाविहारास जा. ह्मणन सांगितले. नंतर त्या मुलाने तेथे प्रयाण करून, द्वाराजवळ जाऊन कांहीं गाथा ह्मटल्या. त्यावेळी तेथे विहाराधिपति प्रसिद्ध सत्पुरुष श्रीसहरभद्र हे होते. त्यांनी नागार्जुनास भिक्षु कले. पुढे कित्येक दिवसांनी मगधदेशांत दुष्काळ पडून विहारांतील भिक्षूच्या पोटापाण्याची फार टंचाई पडू लागली. त्यावेळी झालेश्या त्यांच्या हालाने नागार्जुनाच्या मनावर फार चमत्कारिक परिणाम झाले. यावेळी प्रथम या लोकांचे व विशेषेकरू न नागार्जुनाचे लक्ष, भिक्षूसाठी लोकांवर तर भार न टाकता. मंच मिळविण्याचा या जगांत कांहीं मार्ग आहे की काय, या शोधाक