पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३ वे ] सिद्ध नागार्जुन व त्याचे ग्रंथ. Buddhist Records of the Western World Vol. II, p. 213. हुएनसांग हा इकडे ( हिंदुस्थानांत ) इसवी सन ६२९ च्यानंतर १६२० वर्षे होता. त्यावेळी जर नागार्जुनाच्या कथा प्रचलित होत्या तर इ. स. ९०० च्या सुमारास ता निवर्तला, हे आल्बीरुणीचे विधान खरे कसे मानतां येईल? नागार्जुनास किमया ' ऊर्फ ' रसविद्या' येत होती, व ते सातवाहन राजाचा मित्र होता याबद्दलही हुएनत्सांगने लिहिले आहे. तेव्हां, हुएनसांगचा नागार्जुन कोण याबद्दल शंका राहत नाहीं. इ. स. ६२९ च्या सुमारास इकडे, नागार्जुन एका सातवाहन राजाचा मित्र व रसविद्याप्रवीण म्हणून प्रसिद्ध असल्याचे यावरून कळून येईल. हुएनत्सांग लिहितोः-* नागार्जुन was a friend of सात वाहन * a king of कोसल country to the southvyest of Urisya ( आडिसा ) and vatored by the upper feeders of the Mahanadi.-Ibid, IT, P. 209. या सातवाहनाच्या काळाबद्दल Burgress चा आकयालॉजिकल सर्वे आफ इंडिया पहा. प्रबधचिंतामणतील अगदी प्रारंभी जी हकीकत दिली आहे. तिला हुएलसांगच्या या उल्लेखावरून बळकटी येते व सातवाहनाचा व नागार्जुनाचा संबंध होता, हैं ऐतिहासिक दृष्ट्याही खरे मानावे लागते. नागार्जुनाचा समकालीन सातवाहन शककर्ता सातवाहनच होय कीं नव्हे एवढेच आतां पाहणे जरूर आहे. बहुधा ते एकच असावेत; कारण युरोपीय विद्वान् बौद्ध परंपरावरून नागार्जुन इ. स. च्या पहिल्या शतकांत होऊन गेला असेच मानतात, व ते वरील परंपरेशी जुळते; पण अकराव्य । शतकांतील राजतरंगिणीकाराने नागार्जुन हा शाक्यसिंहानंतर १९० वर्षानंतर होऊन गेला असे लिहिले आहे. यावरून तो शकापूर्वी आणखी ३०० वर्षे जाऊ शकतो; पण राजतरंगिणीकाराचे हे विधान आल्बीरुणीच्या विधानाप्रमाणेच चुकीचे असावे असे वाटते. राजतरंगिणीकाराला अकराव्या शतकांत नागार्जुनाच्या काळाबद्दल काय प्रमाणे मिळाली असतील ती असोत ! ती त्याच्यावेळीही दुर्मिळ असावीत असे आल्बीरुणीच्या त्याच्या ग्रंथांच्याहो दुर्मिळत्वाविषयींच्या उल्लेखांवरून वाटते. इ