पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- । । । १३ वें] सिद्धनागार्जुन च त्याचे ग्रंथ. हकीकतीपैकीं वड्याच भागाला 'ऋतपुरपुराण' नामक पौराणिक ग्रंथाचा आधार आहे असे ह्मणतात. कृतपुर' ह्मणजे गदग कृतपुरपुराणांत गद्ग व त्या आसपासच्या प्रदेशांचे माहात्म्य आहे. पण अद्यापि हा ग्रंथ मला पाहण्यास मिळाला नाहीं. नागार्जुन नांवाचा माध्यमिकमताचा एक प्रसिद्ध बौद्धहीं होता अशी तिसरी एक प्रसिद्धि आहे. नागार्जुन ज्या काळी होऊन गेला त्याकाळ धमतर करण्याची फार पद्धत असल्यामुळे कारणपरत्वे एकाच मूळच्या वैदिकधर्मीय नागार्जुनाने जैन व बौद्ध धर्म स्वीकारला असावा असे आह्मांस वाटते. अशा प्रकारे नागार्जुन एकच पण चोहोकडे तांत्रिक विद्या व रसविद्या यांमध्ये प्रवीण म्हणून प्रसिद्ध असलेला लेखक असल्याचे कळून येईल. रसवैद्यक व साध्या वैद्यकांतही तो अति निपुण होता असे दिसते. नागार्जुनाचा उल्लेख नदिसत्रे व आवश्यक सूत्रे यांच्या प्रारंभ आहे. ( Ind. Ant. Vol. 18, P. 8. पहा ) यानें आयरसायन शास्वांत बरीच सुधारणा करून नवे शोध लावले असे म्हणतात. रसरत्नसमु - चयकाराने व नित्यनाथाने ( रसरत्नाकरकासने ) २७ रसासद्धांत याची गणना केलेली आहे. बौद्धांत, जैनांत व वैदिकांत हा प्रसिद्ध होऊन गेल्या मुळे या सर्व परंपरेपध्ये त्याचे नांव आढळते या सर्व परंपरेत वर्णित असलेला. नागार्जुन एकच प्राद्ध मनुष्य असावा, असा आम्ही. वर आमचा ग्रह दिलेलाच आहे. प्रत्येक परंपरेत तो प्रसिद्ध होता; व त्या त्या लोकन त्याविषयी काहीतरी लिहून ठेविलेलेच आहे. ते कितपत एकमेकांशी सुसंगत असेल हा प्रश्नच आहे. फार प्राचीनकाळी होऊन गेलेल्या प्रसिद्ध पुरुषांविषया, त्यांच्या काळाविषयी असाच घोटाळा नेहमी बहुधा असतो. बौद्धधर्माच्या प्रावल्याच्या काळांत कांहीं रोगांवरची औषधे शिलालेखांत. कोरून ठेविलेली असत, असे वाटते; कारण वृंद व चक्रपाणि यांनी एका अंजनाचा प्रयोग देऊन ते पाटलिपुत्रांत नागार्जुनाने, स्तंभावर कोरिला सेता असे लिहिलेले आहे. .........