पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६४। भारतीय रसायनशास्त्र, [प्रश्चरण नागार्जुनाविषयीं व त्याच्या रसाविद्याप्राविण्याविषयीं कर्नाटकांत व विशे पेंकरून धारवाड जिल्ह्यांत प्रसिद्धी आहे. गदग शहराजवळील कपोतगुडांत त्याने भट्टी लावली होती व तोनागांवी ( नागार्जुनाचा गांव )येथे रहात असे अशी प्रसिद्धी आहे. सर्व पर्वत सोन्याचा करून लक्ष्मीची किंमतच नाहीशी करण्याचा त्याचा विचार दिसल्यामुळे देवांना राग येऊन त्यांनी त्यासठार केले अशी कथा आहे.मरतेवेळीं देखील ही रसविद्या प्रकट व्हाही ह्मणून त्याने खालील अर्धवट श्लोक उच्चारिला अशी आरव्यायिका आहेः तुत्थ्यरसगंधकं । नुथ्यारसगंधकं ॥ मसादु मत्तोंदु । मतदु मत्तोंदु । दुसरी ओळ कानडींतील आहे. तिचा अर्थ असा आहे कीं वरील तीन पदार्थ व आणखी एक आहे; हे चार मिळन कार्य होतं. चौथा पदार्थ उच्चारण्याच्या आंतच त्याची वाचा खुटली व स्मरणशक्ती कमी झाली. नागार्जनाने ही रसविद्या मिळविण्याविषयी फार श्रम केले व तींत त्यास सिद्धि मिळविण्यापूर्वी फार वेळां निराश व्हावी लागलें, वगैरे गोष्टी कानडी लोकांकडून ऐकण्यास मिळतात. त्याने अशा निराशेच्या वेळी काढिलेला उद्गार ह्मणून खालील कानडीवचन प्रसिद्ध आहे त्यावरून रससिद्धि मिळण्यास कसकशाची जरूरी आहे हे कळून येत असल्यामुळे ते वचन येथे देऊन ठेवितोः मुंग वेंयिलिलु ।। वंग बालयलिलु। रस निललिलु ।। सुट्ट गेट्ट हाळनादे भिक्षादेहि ॥ १ ॥ . याचा अर्थ असा की, भृग ( अभ्रक ? ) शिजला ( ह्य. रस झाला ?) नाही. वंगाचा स्तंभ झाला नाहीं; व रस ( अग्नीत ) टिकला नाहीं, यामुळे मी कंगाल होऊन भीक मागत आहे. भिक्षा घाला ! असे ह्मणत तो कि येक दिवस फिरत असे, ह्मणे ! नागार्जुनाने रसविद्येवर कानडींत व संस्कृतमध्ये अनेक ग्रंथ रचल्याविषयी कर्नाटकांतहीं प्रसिद्धि आहे. या