पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३ वें] सिद्ध नागार्जुन व त्याचे ग्रंथ. त्याजजवळ विद्याभ्यासास होती; त्यांनी त्यास मारिले. या शालिवाहनाच्या बायकोचे नांव चंद्रलेखा. | (६) याने रसविद्येचे प्रयोग खवायत (स्तंभनपूर ) व त्याजवळील मेढी येथे केले. | ही हकीकत ऐतिहासिक कसोटीस कितपत टिकते हा एक प्रश्न आहे पालिठाण्यास रणसिंह नांवाचा राजा शकारंभाचे सुमारास असल्याबद्दल कोठे पुरावा आहे काय ? नागार्जुन भोपला राजकन्या व नागराज वासुकि । यांचा पुत्र असें ह्मटलेलें आहे खरे; पण नागराज वासुकीचा पुत्र ह्मणजे काय ? त्यावेळीं वासुकी (व तोही नागराज !) कोठून आला ? पादलिताचार्यांच्या काळाबद्दल स्वतंत्रपणे जैनग्रंथांत कोठे माहिती मिळते काय त्यांची प्रसिद्धी जैन वाङ्मयांतून असली पाहिजे; त्यांचे ग्रंथ कांहीं या विषयावर आहेत काय ? त्यांत नागार्जुनाचा कोठे उल्लेख आहे काय ? नागार्जुनाचे रसशास्त्रावर व पादुकासाधनांवर लिहिलेल्या ग्रंथाठाई पालि प्राचार्यांचा का उल्लेख नसावा? अथवा असा उल्लेख असल्यास तो कोठें। आहे ? शककर्ता पैठणच्या शाब्विाहनाची स्त्री चंद्रलेखा होती याला दस कोठे प्रमाण आहे काय ? पादलिप्ताचार्य, रणसिंहराज व शालिवाहनराज हे समकालीन असल्याबद्दल पुरावा कांहीं आहे काय ? नागार्जुनचा स्नेही शालिवाहन शककर्ताच होता यास प्रमाण कांही आहे काय ? की हा किंवदंतीच आहे ? इतक्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर मिळाल्यानंतर ही हकीकत ऐतिहासिक कसोटीस उतरल्यासारखी झाली. या हकीकताचा प्रदेश उत्तरेकडचाच असून तो गुजराथ व खवायतापासून पैठण पर्यत । व्यापून आहे. ही एक हकीकत झाली. सर्व हकीकती मिळाल्यानंतर पुढे . निष्कर्ष काय निवतो हे नंतर सविस्तरपणे पाहू. ही हुकाकत काठे आहे याबद्दल शोध करीत असा अह्मोस असे कळत आॐ आहे की, ती प्रबंध चिंतामणी नाभक जैन ग्रंथांत आहे प्रबंधचतामणी विषय पुढे लिहिलेलेच आहे. १