पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६२ [ प्रकरण - भारतीय रसायनशास्त्र, प्रकरण १३ दें. ॐ सिद्ध नागार्जुन व त्याचे ग्रंथ. ॐ ।। सिद्ध नागार्जुनाविषयीं हकीकत लोकमित्र (आक्टोबर १९०६) व - पधी बाड, दुसरी आवृत्ति (आ. म. शंकर दाजी शास्त्री पदकृत, पृ. १६३ - १७० ) यामध्ये प्रसिद्ध झालेली आहे. पण या दोन्ही ठिकाणी लेखकांनी नागार्जुनाविषयींची ही हकीकत कोणत्या ग्रंथाच्या आधारे किंवा कशावरून दिली आहे, हे बिलकुल लिहिलें नाहीं, ही दुर्दैवाची गोष्ट होय, दोघांची बहुतेक हकीगत एकच आहे. यावरून ती त्यांनी एकमेका पासून तरी घेतली असावी, अगर एकाच मुळावरून तर घेतली असावी, पण त्या मूळ ग्रंथाचा दोघांच्याही हकीकतींत उल्लेख नाहीं, नागार्जुनास झाल्यास आज जवळ जवळ १८०० वर्षे झाली; तर इतक्या प्राचीन हकीकतीविषयीं। योग्य ग्रंथोक्त प्रमाणे पाहिजेत, त्या शिवाय त्या हकीकतीस इतिहासाचे स्वरूप येत नाहीं. वरील दोन्ही हकीकततील पाल्हाळ सोडून देऊन त्याचा इतिहासिक निष्कर्ष काढिला तर नागार्जुन विषयीं खालील माहती कळते. (१) नागार्जुन मंत्र, तंत्र, रसविद्या, पादुकालाधन, आकाशगमन इत्यादि विद्यांत अत्यंत निष्णांत होऊन सिद्ध झालाः ३) तो पालिठाण्याच्या रणसंह राजाची कन्या भेापळा व बागराज वासुकी याचा पुत्र होता; ह्मणून त्यास नागार्जुन असे नांव पडले. | (३) नागार्जुन प्रथम मोठा शैव व तांत्रिक होता; पण रसविद्या व आकाशगमन हीं साध्य करून घेण्यासाठी त्याने पादलिप्ताचार्य नामक एका जैन श्रावकाचा शिष्य होऊन त्यास प्रसन्न करून घेतले. त्याज कडून त्याने त्या दोन्ही विद्या मिळविल्या. ( ४ ) तो शककर्त्या पैठणच्या शालिवाहनाचा समकालीन होता, व त्यां दोघांचा कांहीं कारणांनी स्नेह जमला. शालिवाहनाची दोन मुलें।