पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ वें. ! ४९६ प्रकरण ६ वें. 22 रसेंद्रचिंतामणि. * ।। । । हा ग्रंथ गुहकुलसंभव श्रीरामचंद्राने लिहिलेला आहे. याची कुलदैवते श्रीमदविका व महेश्वर ही होत याने आपल्या ग्रंथास रखेंद्रचिंतामणी असे कां नांव दिले हे याप्रयारे सांगितले आहेः-- लघीयः निखिलरसज्ञानदातृत्वाच्च चिंतामणि रिव चिंतामणः ॥” हा ग्रंथ लिहितेवेळी आपण अनुभव घेऊनच लिहिले आहे, अनुभवाशिवाय गुरु व शिष्य व्यर्थ होत, याविषयी त्यानी असे लिहिले आहेः आस्वाद्यं बहु विदुषां मुखादप ( ब ) इयं ।। शास्त्रेषु स्थितमकृतं न तल्लिखामि ॥ यत्कर्म व्यरचयमन्नतो गुरूणां ।। प्रौढाणां तदिह वदामि विस्तरेण ॥ १ ॥ । अध्यापयंति यदि दर्शयितु क्षमंत ।। सूतेंद्रकर्मगुरवो गुरवस्त एव ।। शिष्यास्त एव रचयंति गुरोः पुरो ये । शेषाः पुनस्तदुभयाभिनयं भजते ॥ २ ॥ संस्काराः परतंत्रेषु ये गूढाः सिद्धिसूचिताः ।। तानेव प्रकटीकर्तुं उद्ययं किल कुर्महे ॥ ३ ॥ या प्रकारें ग्रंथकाराने आपल्या ग्रंथाचे महत्व वर्णन केलेले आहे; यापैकी बहुतेक श्लोक आयुर्वेदप्रकाश कत्याने प्रस्तावनेत उतरुन घेतलेले आहेत, जे स्वानुभवाचे श्लोक ते सुद्धां पुढे नुसते तसेच उतरुन घेतलले आढळतात; यावरून प्रयोगशास्त्रांत भारतीयांची किति अवनती झालेली होती हे कळून येईल. रसेंद्राचतामणीची कलकत्ताप्रत अत्यंत अशुद्ध आहे; या ग्रंथांत खालील गंथांचा व ग्रंथकारांचा उल्लेख आहेः