पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५वे ] रेसरत्नसमुच्चयः सोमदेव-हा राजा होता असे ‘सोमदेवभूभृत्’ ‘सोमदेवसेनानी' वगैरे जे प्रयोग आढळतात त्यावरून कळून येते. सोमदेवराजा व त्याचा सेनापती या दोघांनीही रसवैद्यकावर ग्रंथ लिहलेले होते असे वाटते. सोमदेवसेनानी हे फक्त सोमदेवासच उद्देशून झटले असेल तर सोमदेवाची वेगळा सेनापती गृहीत धरावा लागत नाही. या सोमदेवाने बरीच रसशास्त्र पाहून रस यंत्रांविषयीं एखादा ग्रंथ लिहिला होता असे वाटतें:- रसनिगपमहाब्धेः सोमदेवः समंतात् । स्फुटतरपारापानापरत्नानि हृत्वा ॥ व्यरचयदातयत्नात्तौरमां कंठमालां । यति भिगो मंडनार्थ सभायां ॥ १-८९ ॥ अथ यंत्राणि वक्ष्यंते रसतंज्ञाण्यानेकशः ॥ समालोक्य समासेन सोमदेवेन सांप्रत ॥९-१ ॥ या उल्लेखांवरून कोणास असे वाटण्याचा संभव आहे की रसरत्न. समुच्चय हा ग्रंथ वाग्भटाने लिहिला नसून सोमदेवाने लिहिला पण रसरत्नसमुच्चयांत पूर्वग्रंथांतील जसेचे तसेच उतारे कांहीं स्थळी घेतलेले असतात हे लक्षात ठेविलें मगने (९-१) हा श्लोक मूळच्या सोमदेवाच्या ग्रंथातीलच असावा, असे कळून येईल. सोमदेव हा रसयंत्रवेत्ता ह्मणून प्रसिद्ध होता व तो रसरत्नसमुच्चयकाराहून प्राचीनतर होता, हे खालील नाभियंत्राविषयींच्या उल्लेखांवरून कळून येईल:-- नंदी नागार्जुनश्चैव ब्रह्मज्योतिर्मुनीश्वरः ।। वेत्ति श्रीसोमदेवश्च नापरः पृथिवीतले ॥ ९-६५ ॥ | या पद्यांत कदाचित् कालानुक्रमही असण्याचा संभव आहे. तसा जर कालानुक्रम यांत असेल तर नंदी किंवा नंदीश्वर हा ग्रंथकार नागार्जुनाहुन (इ. स. १००) प्राचीनतर ठरेल; व ब्रम्हज्योतिर्मुनीश्वर हा नागा | १ यावरूनच रसशास्त्रावर किती विस्तृत वाङ्मय पूर्वी निपजले असावें हें अप णास कळून येईल, २ सोमदेवाचा रसेंद्रचूडामणि नांवाचा एक ग्रंथ असून त्यांतून बहुधा ही भाग सरत्नसमुच्चयकाराने उतरून घेतला आहे असे प्रो. प्रफुल्ल चंद्रराय यांचे मत आहे. His, hindu chemistry, पृ. ११९, टीप पहा.