पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४० भारतीय रसायनशास्त्र. [ प्रकरण प्राचीनतर आहे. व्याडि हा ग्रंथकार इ. पू. ४०० च्या सुमाराचा होता. नासत्य किंवा दस्रसंहिता, भालुकीचा ग्रंथ; भास्कर उर्फ भानूचा ग्रंथ, शंभूच्या नांवावरचा ग्रंथ, (देवीशास्त्र) असे देवतांपासून आलेले आगमग्रंथ याहून प्राचीनतर असावेत असे वाटते. (२०-१०७ मध्ये ) खगेश्वररस ह्मणून बुद्धमुनींच्या नांवावर एक प्रयोग दिलेला आहे. यावरून बुद्धमुनींचा ( इ. पू. ५०० ) एखादा वैद्यकावर ग्रंथ होता, असे दिसते. याहनही प्राचीनकाळी रसवैद्यकाचा इकडे उगम झालेला असावा असे वाटण्यास आणखीही कारणे मिळतात. (२९०३ मध्ये.) आस्तिकोक्त एक तेल दिलेले आहे हे तेल विषकल्पांत दिले आहे; यावरून विषशास्त्रावर आस्तिकाने कांहीं तरी लिहिले होते असे दिसते. हा आस्तक पांडवांच्या नंतरचा जो वैशंपायनराजा त्याच्या वेळेस होऊन गेला असें भारतावरून कळते. हे दोन्ही एकच असावेत. भारतकालीन काश्यप मांत्रिकाचे सर्ष शास्त्रांतील कांहीं उतारे भविष्यपुराणांतलि पहिल्या भागांत दिलेले आहेत यावरून आस्तिक व काश्यप यांनी सर्पविद्येचा अभ्यास केलेला होता । कळन येते. शिवाय, या सर्पविद्येचा उल्लेख वैदिक ग्रंथामधूनही आढळतो यावरून पांडवांच्या पूर्वीपासूनच या सर्पविद्येचा अभ्यास वैदिकऋषि व मुनि करीत असावेत हे उघड होते. पांडवकालीन गर्गाचार्यही वैद्यकांत प्रवीण असावा असे दिसते; कारण एकेठाई त्याविषयी असा उल्लेख आहे. उक्तं श्रीगिरिशेन कालयवनोद्भूत्यै पुरा तत्पितुः ॥ २६-४० ॥ । कालयवनासारखा बलवान् पुत्र निपजण्यासाठी गगचिार्यास शंकरा एक वृष्य प्रयोग सांगितला असे झटलें आहे. या सर्व उल्लेखांवरून पहातां गर्ग, आस्तिक, कश्यप वगैरे पांडवकालीन व्याकंचे वैद्यकावर पूर्वी उपलब्ध असावेत असे अनुमान होते. यामुळे डॉ. गर्दै यानीं रसवै काचा प्रारंभ इ. स. ४०० हा जो धारला आहे तो चुकीचा आहे अॐ मानणे भाग पडतें । हैं