पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय रसायनशास्त्र, [ प्रकरण १ रसार्णव ( ११-१० ) । २ देवीशास्त्र ( ११-१२७ ) ३ रसरत्नाकर (६-९७ ) ४ रससिंधु ( ६-१११ ) ९ रामराजी (५-१४१ ) रसरत्नाकर हा ग्रंथ नित्यनाथ सिह याने लिहला असून त्यांतलि उतारे (५-६७) मध्ये घेतलेले आहेत; पण आनंदाश्रमांत छापलेल्या प्रतीच्या भूमिकेत, हा ग्रंथ रसरत्नसमुच्चयापेक्षां अवचीन आहे हे गृहीत धरून वरील उतारा क्षेपक असावा असे दर्शविले आहे; पण श्रीनित्यनाथाच्या रसरत्नाकरांतून उतोर घेतले एवढेच नव्हे, तर दुस-या एका ठाई (२७) ग्रंथकल्याने श्रीनित्यनाथाच्या नांवाचाही उल्लेख (कामेश्वरमोदका विषयी लिहीत असतां ) असा केलेला आहेः सर्वेषां हितकारको निगदितः श्रीनित्यनाथेनवे || या दुहेरी उल्लेखांवरून रसरत्नसमुच्चयापेक्षां रसरत्नाकर व त्याचा कत श्रीनित्यनाथ हे प्राचीनतर होत हे कळून येईल. याच नित्यनाथ सिद्धानें कामरत्न नामक दुसरें एक तंत्र राचले आहे. याचा काळ कोणता होता हे मात्र कळतनाहीं * रसरत्नाकर' व 'कामरत्न' हीं दोन्हीं तंत्रे आतां छापून प्रसिध्द झालेली आहेत. रससंहिता' व * रसनिगम' हे त्या त्या ठिकाणच्या उल्लेखांवरून पहातां स्वतंत्र त्या नांवाचे ग्रंथ ह्मणून उल्लेखिल्या प्रमाणे दिसत नाहीत. उन्हींचाही सामान्य नामाप्रमाण ‘रसतंत्र' किंवा रसशास्त्र' या अर्थी उपयोग केलेला असावा, असे मला तरी वाटते. पहिली पांच माः आहेत, हे खास.