पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ थे ] धातुवाद खरा आहे ! ही विद्या हिंदुस्थानांत आहे; इतकेच नव्हे, तर पाश्चात्य Alchemy वरचे ( म्ह. रसविद्येवरचे, किमयेवरचे ) ग्रंथ व आपल्याकडचे ग्रंथ हे. ताडून पाहिले असतां, ही विद्याही पूर्वेकडूनच पाश्चमेकडे गेली असे म्हणावे लागते. पारा हा पदार्थ बाहेरचा असेल; पण तो पूर्वी एके काळी हिमालयाच्या आसपास कोटें तरी मिळत असल्याखेरीज त्यास 'शिववीर्य' हे नांव खास आपल्या लोकांनी दिलेले नाहीं असे वाटते. हेमचंद्र नांवाच्या जैन ग्रंथकाराने परिशिष्टपर्वात पाण्याचा सहज असा उल्लेख केलेला आहे कीं:- लब्धः किंचिन्निधानं वा रसो वा साधितस्त्वया ॥ सर्ग ३-१९। . हा उल्लेख इ. पू. चौथ्या किंवा पांचव्या शतकांत होऊन गेलेल्या जंबूस्वामी नांवाच्या एका जैन केवलीच्या हकीकतीविषयी लिहितांना दिलेला आहे. असो. याहीविषयी काळाचा संशय राहतोच. आमच्या पुराण ग्रंथांतून कोठे पाण्याचा उल्लेख आहे काय हे पाहत असतां गरुडपुराणां । असा उल्लेख मिळालाः श्वेतकाचसमं तारं हेमांशशतयाोजतम् ।। रसमध्ये प्रधायेंत मौक्तिकं देहभूषणम् ॥ ३८ ॥ मुक्ताफलपरिक्षा नाम, अ, ६९ दुस-याही एके ठिकाणी अंत्यकर्मप्रकरणांत पाण्याचा स्पष्ट उल्लेख आहे. पाश्चात्य रसग्रंथ व इकडील रसग्रंथ यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास असे समजून येते की, पाश्चात्य रसग्रंथांचीं जा सध्या इंग्रजीत भाषांतरे झाली आहेत, त्यांवरून पाहतां, आपल्याकडील ग्रंथांतील पारिभा पाच त्यांत असल्यामुळे, ती सध्याच्या युरोपीय रसायनवेत्त्यांस समजत नाहीं. ती पारिभाषा मुद्दाम आपल्या व तिकडच्या लोकांनी अशीच गूढ व चम. कारिक ठेविलेली आहे. आम्ही येथे तुलनेसाठीं कांहीं शब्द दोहोकडचे देत त्यांचा तिकडे कांहीं अर्थच होत नाहीं. इकडची परिभाषा ठाऊक असली तर होतो. ती अशीः