पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ थे. ] धातुवाद खरा आहे ! ‘रसजं' ह्मणजे ‘रसेंद्रवेधसंजातं,' रसाच्या वेधाने बनविलेलें. * क्षेत्रजं ' ह्मणजे खाणींतील नेहमींचे, व ‘लोहसंकरजं' ह्मणजे धातु मिश्र करून बनविलेलें. क्षेत्रजाशिवाय कृत्रिमरीत्या दोन त-हेने हेम पूर्वी बनवीत असत; निदान बनविता येते अशी त्यांची समजूत असे; ह्मणजे सोने मूलद्रव्य नसून संकरधातु आहे अशी प्राचीन रसवेत्त्यांची समजूत होती. । (११) नित्यनाथाने रसरत्नाकरांत एके ठायीं लिहिले आहे कींः-- अभ्रकं मारितं येन पारदं च वशीकृतं । द्वारं उद्घाटितं तेन यमस्य धनदस्य च ॥ अभ्रक ज्याने मारिलें, व पारा ज्याने वश करून घेतला, त्याने यमाचे व कुबेराचे द्वार खुलें केलें !!! | रसवेत्यांची समजूत. | सर्व धातु पाण्याचींच विकृत स्वरूपे असून ती कमी अधिक मानाने मलरहित असल्याप्रमाणे त्यांस कमी अधिक गुण व मौल्य आलेले आहे अशी प्राचीन रसवेत्त्यांची व मुनींची समजूत असे. ही कल्पना स्पष्टपणे वाचकांच्या नजरेस येण्यासाठी मी दोन ठिकाणची पारदोत्पत्तीची हकीकत येथे तुलनार्थ उतरून घेतो. रामायणासारख्या ग्रंथांत शिवबीजाचा व इतर धातूंचा असा संबंध पाहून कोणांसही आश्चर्य वाटण्यासारखेच आहे. रसरत्नसमुच्चय ( अध्याय १ ला. ) *शैलेस्मिन् शिवयोः प्रीत्या परस्परजिगीषया । संप्रवृत्ते च संभोग त्रिलोकक्षोभकारिणि ।। विनिवारयितुं वन्हिः संभोगं प्रेषितः सुरैः ।। कांक्षमाणैस्तयोः पुत्रं तारकासुरमारकम् ।। कपोतरूपिणं प्राप्तं हिमवत्कन्दरेऽनलं ।। अपक्षभावसंक्षुब्धं स्मरलीलाविलोकिनम् ॥ तं दृष्ट्वा लजितः शंभुः विरतः सुरतात्तदा ।। प्रच्युतश्च रसो धातुः गृहीतः शूलपाणिना ॥ प्रक्षिप्तो वदने वन्हेः गंगायामपि सोऽपतत् । बहिः क्षिप्तस्तया सोपि परिदंदह्यमानया ।।। *हिमालयावर,