पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७ ४ थे. ] धातुवाद खरा आहे ! आपल्याकडेही अशा नाना प्रकारच्या बैराग्याच्या गोष्टी किमयेसंबंधी छोकांनी पाहिल्या आहेत व ऐकिल्या आहेत. आपल्याकडे अशा गोष्टी लिहून । ठेऊन त्यांची पुढे चौकशी करण्याची बुद्धि फार कमी असल्यामुळे जिकडे ५ तिकडे अनुभवाच्या लेखांचा अंधेर आहे. ही उणीव अंशतः तरी दूर करावी ह्मणून मी किमयेविषयी आपला अनुभव देऊन ठेवितों. किमयेविषयीं स्वानुभव. एका बैराग्याने जून १९०८ मध्ये माझे समक्ष केलेले प्रयोग. हुबळीस दारावर एक बैरागी पाण्याचे लिंग, मणि, वगैरे बनविलेले कोणांस पाहिजे आहेत काय ह्मणून विचारीत चालला होता. मी सहज त्यास आंत बोलाविले. मी त्यापूर्वी ५/६ महिने रसशास्त्रे वाचीत असल्यामुळे, रसलिंगाचे महत्व थोडेसे समजले होते; शिवाय, पारा घट्ट व अग्निस्थिर असा मिळाला ह्मणजे किमयेचे अधैं कार्य झाले असे ऐकिलेले होते. त्यामुळे, बैराग्याने केलेले आहे तरी काय, हे पहावे ह्मणून मी त्यास आंत बोलाविले. तो आंत आला. त्याने प्रथम घट्ट पाण्याचे लिंग, नंतर मणि, आंगठ्या वगैरे दाखविल्या. त्या वस्तु दुधांत ठेऊन दूध प्यालें असतां देहाला आरोग्य होते ह्मणून सांगितले. मी त्यास विचारिले “हा पारा कसा घट्ट बनविला?' “वनस्पतीच्या योगें' हे ठराविक उत्तर मिळाले. ती वनस्पती कोणती हे विचारले तरी तो सांगेना; मग ‘मजसमोर पारा घट्ट करून दाखवीत असाल तर पाहण्याची इच्छा आहे' असे मी झटले. पण त्यास बैराग्याने कांहींच उत्तर दिले नाहीं. नंतर त्याने पारा लोण्यासारख्या स्थितीत आणिलेला व काचेच्या पुडीसारख्या स्थितीत असलेला दाखविला. या प्रकारे पारा नाना स्थितींमधून जाऊन शेवटीं घट्ट होतो असे त्यांनी सांगितले. (२) यानंतर तो बैरागी त्या दिवशी निघून गेला. पुढे एकदोन दिवसांनी येऊन त्याने ' तुला एक प्रयोग करून दाखवितों' ह्मणून सांगितले. या दिवशी त्याने पाण्यावर एक पांढरें स्वच्छ भस्म घालवून वर मेणाने ते झांकवून, ती शेणी विस्तवांत ठेववून अग्नि प्रज्वलित करविला. पुढे तो पारा घट्ट बनून त्याचे रुपे झालें ! हा पारा मीच बाजारांतून आणिला होता. तो