पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ थे. 1 धातुवाद खरा आहे ! र्णव, रसरत्नसमुच्चय, रसपद्धति, रसहृदय इत्यादि अनेक ग्रंथांचीं प्रमाणे आहेत; व तसे करण्याची उदाहरणेही लोकसमूहांत बरीच सांपडतात. ( नंतर ज्ञानेश्वरीतील किमयेच्या निदर्शक ह्मणून कित्येक ओव्यांचा त्यांनी उतारा दिला आहे; त्या सर्वच ओंव्या किमयेच्या नाहीत अशी आमची समजूत आहे. आमच्या मते खन्या किमयेच्या निदर्शक ओंव्या ह्याः-) | परी मात्रेचेनि मापे । दिव्योषध जैसे घेपे । कथलाचे कीजे रुपे । रसभावने ॥१॥ जैसे कनकी तेजपाणी । मीठाते बांधी आणि । ते तुल्याच मेळवणी । रसांतराची ॥ २ ॥ जैसे रसौषध खरे । आपले काज करुनी पुरे। शेखी आपणही नुरे । तैसे होतसे ॥ ३ ॥ पितळेची गंधी काळीक । जै फिटली होय निःशेष । तरी सुवर्ण काय आणिक । जोडु जाईजे ॥ ४ ॥ कां पाठोवाट पुटे । भांगार खार देणे घटे । तें कीड घडकरी तुटे। निव्र्याज होय ॥५॥ नात जे धातुवादाही न जोडे । तें लोहच पंधरें सांपडे । नैं दैवयोगें चडे । परिस हातां ॥ ६ ॥ ओंव्यानंतर ह. श्रीपतिबोवा पुढे लिहितात की, “या ओंव्या किमयेच्या अर्थाच्या स्पष्ट बोधक आहेत; आणखीही पुष्कळ ओंव्या सांपडतील. परंतु किमयेच्या भाषेचे अर्थज्ञान झाले पाहिजे. नाग, नागीण, विंचू, सारी, मारी, धसा, मासा, कमठ, कढी, कीट, पुट, किडाळ, रवि व चंद्र इत्यादि शब्द किमयेच्या ग्रंथांत वापरलेले आढळतात; त्यांचे गुरुमुखाने ज्ञान झाल्यावांचून त्या शब्दांचा अर्थ जसा समजावा तसा समजत नाहीं. गोरक्षकिमयागार नांवाच्या ग्रंथांत असे किमयेचे शब्द फार आहेत. कांहीं संप्रदायिक पुरुषाकडे गाळून टाकिलेल्या किमयेच्या ओव्यांची यादीही सांपडते; पण त्यांची दीक्षा घेतल्यावांचून व संप्रदायिक बनल्याशिवाय ते इतरांस सांगत नाहींत.}} वरील ज्ञानोबारायांच्या ओव्यांत खालील रसशास्त्रांतील सिद्धांताचे उल्लेख आहेतः (१) कथिलास एका विशिष्ट मात्रेनें रसभावना दिल्यास त्याचे रुपें होते * मोरोपतांनीही एकठायीं ( ह. वं. अ. ४२) याचे सिद्धांताचा असा उल्लेख केलेली आहेः-* की सिद्धपारदाचे श्रेयस्कर लंघिजे वच न कथिलें ॥ "