पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४. थे. ]
११
 



प्रकरण ४ थे.
धातुवाद खरा आहे !
_______________

 पूर्वी नाथपंथांतील लोकांनी तीनचार विषयांचा चांगलाच अभ्यास केलेला होता. ते विषय ह्मणजे मुख्यत्वेकरून हे:- (१) योगशास्त्र, (२) भक्तिशास्र, (३) रसशास्त्र किंवा किमया, (४) ब्रह्मज्ञान व मोक्ष. नाथपंथांतील लोकांनीं तंत्रग्रंथांचे चांगलेच अध्ययन केले होते, इतकेच नव्हे, तर कित्येक नवीन तांत्रिक ग्रंथही त्यांनी रचून ठेवलेले आहेत. हा नाथपंथ फार प्राचीन आहे अशी आमची समजूत आहे. सध्यां तर गौडपादनाथाचार्य व गोविंदनाथमुनि या श्रीशंकराचार्यांच्या गुरुपरंपरेतील नाथांपेक्षां प्राचीनतर नाथ मला माहीत नाहीत. मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तिनाथ यांच्यानंतरचे शिष्य ज्ञानेश्वर हे जसे केवळ वेदांतमार्गी झाले, तद्वतच गौडपादनाथाचार्य व गोविंदनाथमुनि यांचे शिष्य प्रसिद्ध श्रीशंकराचार्य हे केवळ वेदांतमार्गी बनले. श्रीशंकराचार्य व श्रीज्ञानेश्वर हे दोघेही एकाच नाथपरंपरेतील असून त्यांनी त्या परंपरेतील सर्वच विषयांचे ज्ञान जगांत प्रगट केलें नाहीं. भक्तिशास्त्र, योगशास्त्र व ब्रह्मज्ञान या तिन्हीवर वरील दोघांनी पुष्कळच लिहिलेले आहे. रसविद्या ऊर्फ किंमयेचे मात्र श्रीशंकराचार्य व श्री ज्ञानेश्वर यांनी बरेच गूढ ठेविलेले आहे; तथापि रसविद्या ऊर्फ किमया या दोघांसही माहीत नव्हती असे मात्र नाही. त्यांच्या ग्रंथांतून किमयेचे उल्लेख बरेच आढळतात; व त्यांवरून त्यांस तो विषय चांगलाच अवगत होता असे कळून येते. श्रीशंकराचार्य व श्रीज्ञानेश्वर यांनी स्वतः जरी या प्रकारे किमया जगांत प्रगट केली नाहीं, तथापि त्यांच्या गुरुपरंपरेतील मंडळींनी रसशास्त्रावर स्वतंत्र ग्रंथच लिहून ठेविलेले आहेत. येथे ते ग्रंथ कोणते आहेत हैं। पाहण्याचा किंवा दाखविण्याचा माझा इरादा नाहीं. श्रीशंकराचार्यांच्या ग्रंथांत स्पर्शवेधाचे व इतर किमयाविषयक उल्लेख कोठे कोठे आलेले आहेत.* ज्ञाने-


 * शतश्लोकींत हा श्लोक आहे :-

दृष्टांतो नैव दृष्टः त्रिभुवनजठरे सद्गुरोर्ज्ञानदातुः ॥
स्पर्शश्चेत्तत्र कल्प्य: स नयति यदहो स्वर्णतां अश्मसारं