पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/190

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

•१ वे ] १८३ प्रकरण. ४० वें । * रसमुक्तावली * रसमुक्तावली हा ग्रंथ वैद्यशास्त्रदृष्टया बराच महत्वाचा दिसतो. याचे सुमारे १३०० श्लोक आहेत. प्रारंभी ग्रंथकाराने आपणांस ' वैद्यनृपस्य । सुनुः' असें ह्मणवून घेतलेले आहे. पुढे तो लिहितो कीं:- रसग्रंथान्विनिर्मथ्य गृहीत्वा सारमुत्तमं ।। ग्रथिता योगमुक्ताभिः रसमुक्तावली शुभा ॥ २ ॥ वैधृता निज़कंठेषु सर्वथेयं भिषक्रप्रिया ।। एवं रस सुवैद्याः स्युः नृपमान्यास्तथेश्वराः ॥ ३ ॥ औषधं मूढवैद्यानां दासीसुरतवद्भवेत् ।। दैवात्सौख्यं भवेत्कामं व्याधिः प्राणांतको भवेत् ॥ ४ ॥ या ग्रंथाच्या कर्त्यांचे नांव शेवटपर्यंत पाहिले पण कोठेही आढळत नाहीं. * वैद्यनृपस्य सूनुः' यांतच कर्त्याने आपल्या बापाचे नांव सुचविलें असेल की काय अशी शंका येते. ग्रंथकार ह्मणतो त्याप्रमाणे यांत योग, रूप मोतीं पुष्कळ आहेत. प्रकरण४१ वें.

  • रसावतार. * या ग्रंथाची एक अपुरी हस्तलिखित प्रत मुबइच वैद्य यादवजी त्रिकमजी आचार्य यांचे कडून मिळाली. ग्रंथ अपुरा असल्यामुळे कत्र्याचे नांव कळत नाही ही मोठ्या दुःखाची गोष्ट होय !

ग्रंथांतरात्किमपि सारतरं प्रगृह्य । यच्चानुभूतमपि वृद्धगुरूपदिष्टम् ॥ संग्रथ्यतेऽल्पतरवुद्धिजनप्रबुध्यै ।। सूतामृतं स्वमिति कल्पितपद्यबंधम् ॥ २ ॥ संतः प्रकुर्वन्तु कृपां मदीये ।। | ग्रंथल्पाबुध्द्या ग्रथिते समासात् ॥ अवद्य मप्यास्ति यत्र किंचित् । शोध्यं यतस्ते सकृपाः प्रसिद्धाः ॥ ३ ॥ न चित्रमत्रास्ति परस्वभावः ।। यो दुर्जनानां गुणतापहारी ॥