पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/189

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८२ भारतीय रसायनशास्त्र. [ प्रकरण मी इतकींप्रमाणे दिलेली आहेत व इतका विस्तार केलेला आहे. याने हा वाद एकदांचा मिटेल, अशी मला आशा आहे. वरील घोटाळे व अडचणी नाहीशा होणे शक्य नसल्यामुळे वैद्यवाग्भट व रसवाग्भट हे भिन्न भिन्नच मानणे जरूर पडते. प्रकरण ३९ वें * रसमंजरी * हिची एक अर्धवट प्रत मला बडोद्याहून पहाण्यास मिळाली. ग्रंथकत्यविषयी थोडीशी माहिती मिळाली ती येथे देतः श्रीवैद्यनाथतनयः सनयः सुशीलः ।। श्रीशालिनाथ इति विश्रुतनामधेयः ॥ तेनावलोक्य विधिवत् विवीधान्प्रबंधान् । आरुच्यते तु सुकृती रसमंजरीयम् ॥ ३ ॥ सन्मोच्युतवृदानां सततं चित्तहारिणी । अनेकरसपूर्णेयं क्रियते रसमंजरी ॥ ४ ॥ हरति स कलरोगान् मूर्छितो ये नराणाम् । विसरति किल बद्धः खेचरत्वं जवेन ॥ सकलसुरमुनदेवदतं शंभुबीजं ।। स जयति भवसिंधोः पारदः पारदोऽयं ॥ ५॥ तेजो मृगांकमौलेः शोदुत्पन्नेव ( ? ) तेजसा पुजैः । अजरामरत्ववीतरणकल्पतरूं तं रसेश्वरं वंदे ॥ ६॥ यो न वेत्तिं तपोराशि रसं हरिहरात्मकं । वृथा चिकित्सां कुरुते स वैद्यो हास्यतां व्रजेत् ॥ ७ ॥ शुधनमहाराशिं यद्वद्दहति पावकः । तद्वद्धातुगतः सूतः रोगान्हंति रुजोद्भवान् ॥ ८ ॥ या ग्रंथाचा कर्ता श्रीशालिनाथ याने अनंतमुनीच्या रसरत्नप्रदीपाचा बराच उपयोग करून येतला आहे असे दिसते; यामुळे हा रसमंजरीकार रसरत्नप्रदीपाहून अर्वाचीन तर असावा. प्रत अपूर्ण मिळाली यामुळे अंत वगैरे पहाण्यास मिळाला नाहीं.