पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/188

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३८ वें ] वाग्भट व रसरत्नसमुच्चयकार १८१ तसेच, र. र. स. मध्ये चर्पटिनाथाचा व सिंघणराजाचा उल्लेख आहे. ( पृष्ठे ३९/४४ पहा ) हे दोघेही तेराव्या शतकाच्या सुमारास होऊन गेले. यांचा रसवाग्भटाने उल्लेख केलेला असल्यामुळे तो इ. स. १३०० च्या सुमाराचा असावा. | तसेच, नित्यनाथ सिद्धाच्या रसरत्नाकरांतील वादिखंडांतील, * संसारस्य परं पारं दत्तेऽसौ पारदः स्मृतः ।' ही ओळ सर्वदर्शनसंग्रहांत माधवाचाचायनीं उतरून घेतलेली आहे. या नित्यनाथाने चर्पटीचाही उल्लेख केलेला आहे. तेव्हां याचा काळ इ. स. १२५० ते १३०० हा असावा. या नित्यनाथाचा उल्लेख र. र. स. ह्याने [ ५।५७ मध्ये ] व दुस-या एका ठिकाणी असा केलेला आहे. सर्वेषां हितकारको निगदितः श्रीनित्यनाथेन वै । | यावरूनही इ० स० १३०० नंतरच नित्यनाथांनंतर रसवाग्भट हो ऊन गेला हे सिद्ध होते. साधारणतः इ० स० १३०० हाच काळ रसवाग्भटाचा धरितां येईल, या कारणांमुळे * वैद्यवाग्भट” व “ रसवाग्भट ' एकच होऊ शकत नाहींत दोघांचे काळ अगदी भिन्न आहेत. एक इ० स० ६०० पूर्वी २०० वर्षे तर खास आहे; व दुसरा इ० स० १३०० च्या नंतर चा खास असला पाहिजे. यामुळे वैद्यवाग्भट व रसवाग्भट एक होऊ शकत नाहींत. वाग्भटाच्या वेळी रसविद्या नव्हती ह्मणून वैद्यवाग्भट व रसवाग्भट एकच नव्हे असे नसून या दोघांच्या ऐक्यांत वरील विघ्नं येतात. रसविद्येचा प्रारंभ भरतवर्षांत इंद्रद्युम्न, वसिष्ठ, मांडव्य, लंकेश, ऋष्यशृग, वाल्मिाकवगैरे रामायणकालीन व्यक्तींपासूनच कसा आहे, हे मी मागें दर्शविलेलेच आहे. तेव्हां, रसावधेचा अभाव हे खरे कारण नसून, त्याच्या भिन्नतेला वरील कारणे अस्तित्वात आहेत. या विषयांसंबंधाने जुन्या व नव्या मतांमध्ये फरक राहूं नये ह्मणून