पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/187

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८० भारतीय रसायनशास्त्र [ प्रकरण बरचे चरक, सुश्रुत व वाग्भट यांच्या ग्रंथांचाहीं भघांतरे असल्याचे आढळून आलेले आहे. जॉर्ज हूथ साहेबाने या भाषांतरांचा काळ अगदी अलीकडचा ह्मणजे इ. स. च्या आठव्या शतकांत येतो असे ठरविलेले आहे. यावरूनही इ० स० ६००-७०० च्या पूर्वी ब-याच काळापासून वैद्यवाग्भट प्रसिद्ध असावा असे अनुमान निघते. || चिनी प्रवासी इटासंग याने आयुर्वेदाच्या एका अष्टांगसंग्रहकाराचा उल्लेख केलेला आहे, व हा संग्रहकार ह्मणजे बहुधा वैद्य वाग्भटच असावा. तो उल्लेख असाः- “ These eight arts formerly existed in eight books, but LATELY A MAN epitomised them and made them into one bundle. ” Itsing RECORDS OF THE BUDDHIST RELIGION, P. 128. By Takaktsu. ईटसिंगचा अष्टांग संग्रहकार बहुधा वैद्य, वाग्भटच असावा, यांत शंका दिसत नाही. हा चीनी लेखक इ. स. ६७३ च्या सुमारास हिंदुस्थानांत होता. याच्या पूर्वी २७०-३०० वर्षे वैद्यवाग्भट प्रसिद्ध असला पाहिजे ह्मणजे वैद्यवाग्भट प्रसिद्ध डॉ. गणेश कृष्ण गर्दै, यांनी ठरविलेले असल्याप्रमाणे इ. स. च्या ४ थ्या शतकांत होऊन गेला असला पाहिजे. वरील सर्व प्रमाणे डॉ. गर्दै यांच्या सिद्धांतासच पुष्टता आणणारी आहेत. वैद्यवाग्भट चाणक्या नंतर [ इ. पू. ३२५] व. इ. स. ६०० च्या पूर्वी २००-३०० वर्षे होऊन गेला असावा हे उघड दिसून येते. [ २ ] आतां ‘ रसवाग्भटा' विषयी थोडेसे विचार करून पाहू २. स. ग्रंथांत गोविंद भिक्षुच्या रसहृदयांतील उतारे आहेत ह्या रस हृदयाच्या काळासंबंधी विवेचन मी, नुकतेच निघालेल्या आयुर्वेदीय ग्रंथमाला मासिक पुस्तकाच्या पहिल्या अंकांत रसहृदयाच्या भूमिकेंत, केलेले आहे. रसहृदयकार बहुधा शंकराचार्यांचे गुरु व इ. स. च्या आठव्या शतकांतले होते अर्थात् रसवाग्भट आठव्या शतकाहून अर्वाचीन होय हे खास ठरते,