पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/186

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३८ वे ] वाग्भट व रसरत्नसमुच्चयकार, १७९ व शीतोष्णा वरील एका पुस्तकाचे ( उष्णताशास्त्रावरलि ग्रंथाचे ) याच वेळीं अरेबीत भाषांतरे झाली ! यावरून भारतीय वैद्यकांत आठव्या शतकांत उपलब्ध असलेली पुस्तकेंही तूर्त उपलब्ध नाहींत हे कळून येईल, आयुर्वेदीय ग्रंथापैकी, त्यावेळीं चरक संहिता, सुश्रुतसंहिता, अष्टांगहृदय निदान ( माधव काराचें ), सनकाचे विषतंत्र, व उष्णता शास्त्रावरील एक ग्रंथ इतकें बगदाद येथे प्रसिद्ध होते. यावरून इ. स. च्या आठव्या शतकाच्या मध्यभागीं तरी वैद्य वाग्भटाचा * अष्टांग हृदय ' ग्रंथ प्रसिद्ध होता हे उघडच होते. | चक्रपाणि हा बंगाली ग्रंथकार इ० स० १०४० च्या सुमारास होऊन गेला याने आपला ग्रंथ वृंदाच्या सिद्धयोगावरून * लिहिला असून, चरक, सुश्रुत व वैद्यवाग्भट यांतील अनेक उतारे त्याने आपल्या ग्रंथांत दिलेले आहेत. वृंदाने माधवनिदानाचा रोगक्रम पत्करला आहे. * यावरूनही चक्रपाणीच्या पूर्वी ( १०४० ) एक दोन शतकें तरी वृंदाचा सिद्धयोग प्रसिद्ध असावा, व त्याही पूर्वी शंभर डिशे वर्षे निदान माधवनिदान प्रसिद्ध असावे. ह्मणजे इ. स. ६००-७०० च्या सुमारास माधवनिदान ग्रंथ भरतखंडांत प्रसिद्ध असला पाहिजे. बगदादच्या खलीफानीं आठव्या शतकांत अरबीभाषेत याच माधवनिदानाचे भाषांतर करवून घेतले. माधवनिदान व अष्टांगहृदय मिळवून वाचणा-यांस कित्येक ठिकाणी माधवाने नुसते चरक, सुश्रुत, व वैद्यवाग्भट यांचे भाषांतर केलेले आहे. असे आढळून येईल. यावरून इ. स. ६००७०० च्याही पूर्वी ' वैद्यवाग्भट होऊन गेला असावा असे अनुमान निघते. | तिबेट देशांत कांहीं बौद्ध ग्रंथाची भाषांतरे झालेली आहेत. * तिबेटी तंजुर नांवाच्या एका मोठ्या भाषांतररूपी संग्रहग्रंथांत, इतर ग्रंथाबरो

  • यः सिद्धयोगलिसिताधिक सिद्धयोगान् ।

अत्रैव निक्षिपात केवलयुद्धेरद्वी ॥ * वृंदन...संलिख्यते गदविनिश्चयजक्रमेण,