पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/185

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७८ भारतीय रसायनशास्त्र [ प्रकरण कदाचित् कळेल, शिवसंहिता तांत्रिक ग्रंथ, शंकराच्या नांवावर असल्यामुळे, त्याचाही काळ निश्चित नाहीं. नागार्जुनाच्या काळासंबंधाने सविस्तर विवेचन, करून त्याचा काळ इ० पू० पहिलं शतक असा ठरविलेला आहे तेव्हां, या एवढ्याच प्रमाणांवरून जर रसविद्या आपल्यांत पूर्वी होती असे ह्मणावयाचे असेल तर ते शक्य नाहीं. इ० पू० ३५० च्या पूर्वी ही भारत व रामायणकाळी भारतवर्षांत रसविद्या होती, हे मी दाखविलेलेच आहे. तेव्हां र० र० स० च्या काळापूर्वी इ० स० च्या ४ थ्या शतकांत रसविद्या नव्हती ह्मणून, र० र० स० कार व अष्टांगहृदयकार वेगळे, असे नव्या मतांच्या लोकांचे मत नाहीं. एकाच वाग्भटाने कायचिकित्सा ग्रंथांचे सार : अष्टांगहृदय ' जसे रचिले, तसेच रसग्रंथांचे सार * र० र० स०' लिहिलेले असावे असे ही असंभवते मग अडचण कोठे येते ? या विषयी विचार करूं. आपण सोईसाठी यापुढे अष्टांगहृदयकारास “वैद्यवाग्भट व रसरत्नसमुच्चयकारास रसवाग्भट ‘ह्मणे जुन्या लोकांच्या मताप्रमाणे वैद्यवाग्भट व रसवाग्भट हे एकच धरिले, तर खालील घोटाळे उत्पन्न होतात. या घोटाळ्यांचे कोणी निरसन करीत असल्यास हे होन्हीं वाग्भट एकच होऊ शकतील, | ( १ ) बगदाद येथील खलिफ मनसूर ( इ० स० ७५३-७७४) व खलीफ हरून ( इ० स० ७८६-८०८ ) यांच्यावेळीं बगदाद येथे मूळ संस्कृत ग्रंथांतून अगर पेल्हवी भाषांतरावरून ब्रह्मसिद्धांत, खेडखाद्य, चरक, सुश्रत, निदान, अष्टांगहृदय, सनकाचे विषतंत्र वगैरे भारतीय ग्रथांचे आरबीभाषेत भाषांतर झाले. प्रत्येक ग्रंथांच्या नांवाची अपभ्रष्ट रूपे झालेली असून अष्टांगाचे ' अशंगार' असे त्यांनी रूप केलेले आहे. या खलीफांचे वेळीं बगदाद येथे बरेच भारतीय वैद्य राहिलेले असून ते तेथे आपल चिकित्साकर्म चालवीत असत. मंख नांवाच्या एका भारतीय वैयाने खलीफ हरून अररसचिद यांचा रोग घालविला व यामुळे त्याची सरकारी दवाखान्यावर नेमणूक झाली. या मंखाने सुश्रुताचे व वनस्पतींवरील एका संस्कृत ग्रंथांचे अरेबीमध्ये भाषांतर केले. चरकाचे ।