पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/184

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३८ वै] वाग्भट व रसरत्नसमुच्चयकार. १७७ ७ योगीश्वर ( याज्ञवल्क्य ) यांची संहिता. . येणेप्रमाणे आर्यवैद्यकांचा संक्षिप्त इतिहास ऋषिकाळाचा, दिलेला आहे. प्रकरण ३८ चें.

  • वाग्भट व रसरत्नसमुच्चयकार. * ।

वैद्यराज शिवराम कालिदास यांच्या गुजराथी भाषांतरासह निघालेल्या रसरत्नसमुच्चयाच्या प्रस्तावनेत अष्टांगहृदयकार 'वाग्भट व र० र० स० कार वाग्भट हे दोन नसून एकच पुरुष होत असे मत देऊन, त्याच्या प्रतिपादनाकरितां त्यांनी आपल्या विचारसणीचेही दिग्दर्शन केलेले आहे. जुन्या लोकांचे मत व नव्या लोकांचे मत केव्हा केव्हां जमत नाहीं, हैं। खरे आहे पण नव्या लोकांची मते कांहीं उगीच प्रचलित झालेली नसतात. अष्टांगहृदयकार वाग्भट हा युधिष्ठिराच्या सभेत वैद्य ह्मणून असल्याची जुन्या मंडळीमध्ये प्रसिद्धि आहे; पण त्यास आधार काय ? उलट वाग्भटीय ग्रंथांत चाणक्याचा स्पष्ट उल्लेख असल्यामुळे, त्यास इ० पू० ३०० च्या नंतरच ठरवावे लागते. एकाच वाग्भटाने कायाचकित्सा व रसवैद्यक यांवरील सर्व तत्कालीन ग्रंथ पाहून दोन स्वतंत्र ग्रंथ लिहिणे शक्य नाही, असे नव्या पक्षाचे बिलकुल ह्मणणे नाहीं. असे हा जरूर असू शकेल. अष्टांगहृदयांत रसायणप्रकरण आलें नाहीं एवढ्यावरून पहिल्या वाग्भटाच्या वेळी रसविद्या भारतवर्षांत अवगत नव्हती, असे जुन्या मताप्रमाणे नवीनाचेही मत नाहीं. शिवसंहिता मिळाली, नागा जुनाचे सुटे अध्याय कां, पण संपूर्ण रसरनाकर मला मिळालेला आहे, व सीलोनमध्ये रावणसंहिता मिळालेली असेल–पण एवढ्यांवरूनच-व- रील ग्रंथांचा बरोबर नक्की काळ समजल्याशिवाय-चरकसुश्रुतापूर्वीही रसायनविद्या आपल्यांत होती, हे कसे सिद्ध होते, हे मात्र समजत नाहीं, शिवसंहिता व रावणसहिता यांचा तर काळच माहीत नाहीं. रावणसंहिता रामायणकालीन रावणानेच लिहिली यास प्रमाण काय ? ' ग्रंथ पाहून