पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/183

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७६ भारतीय रसायनशास्त्र, [ प्रकरण ठिकाणीं सांगितलेल्या आढळून येतात; पण नुसत्या नांवापलीकडे त्यांचे कांहीं मिळत नाहीं. हारीतसहितेत ( हल्लीच्या ) कांहीं इतर ग्रंथकारांचा उल्लेख आहे. कांहीं श्लोक गमतीचे असून ह्या बनावट संहितेचा काळ दाखवितात, आदौ यद्गह्मणा प्रोक्तं, अत्रिणः तदनंतरम् ॥ धन्वंतरणा प्रोक्तं च, अश्विनाच महात्मना ॥ १ ॥

  • * * * चरकः सुश्रुतश्चैव वाग्भटश्च तथापरः । मुख्याश्च संहिता वाच्यास्तिस्र एव युगे युगे ॥ २ ॥ अत्रिः कृतयुगे वैद्य, द्वापरे सुश्रुतो मतः ।। कलौ वाग्भटनामा च, गारमात्र प्रद्दश्यते ॥ ३॥ वैष्णवी, चाश्विनी, गार्गी; तत्र माध्याह्निका ऽपरा ॥ मार्कडेया चे कथिता योगिराजेन धीमता ॥ ४ ॥ संहिता ऋषिभिः प्रोक्ता, मंत्रैर्नानाविधैर्विभो ॥ ५ ॥
  • * * * अग्निवेशश्च भेडश्च जातकर्यः पराशरः ॥ ।

हारीतः क्षारपाणिश्च षडेते ऋषयस्तु ते ॥ ६॥ यावरून हल्लीच्या हारीत संहितेवर, चरकाप्रमाणेच, वाग्भटानंतर कोणाचा तरी संस्कार झालेला आहे एक; किंवा ही संहिता संपूर्णच बनावट आहे एक; पैकी पहिला विचारच दाखविण्यास बरीच कारणे आहेत. असो, वरील श्लोकांवरून सहा भिषक् संहिता शिवाय, आणखी खालील वैद्यक संहिता भरतखंडांत हारीतसंहितेच्या संस्कत्याच्या वेळीं प्रचलित होत्या हे कळून येते. १ धन्वंतरि संहिता. २ आश्विनी कुमार संहिता. ३ वैष्णवी संहिता, ४ गार्गी संहिता. ६ माध्यान्हिकी संहिता. ६ मार्कडेय संहिता.