पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/182

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३७ वें ] रसवैद्यकाचा इतिहास १७५ कारण वरील चरकभाष्यांतील वाक्य हल्लीच्या चरकसंहितेत मिळत नाहीं. पतंजली व चरक हे अगदी भिन्न ग्रंथकार असून, चरक हा इ. पू १००० १ १०० च्या सुमारचा असून, त्यावरील भाष्यकार पतंजलि हा इ. पू. १५० च्या सुमारचा आहे. दोघांत जवळ जवळ१००० वर्षांचे अंतर आहे चरकावरच्या टीका, चरकावर चक्रदत्त व शिवदाससेन यांच्या शिवाय हारश्चंद्र भट्टारक याचीही एक टीका होती. तीही हल्ली उपलब्ध नाहीं तिचा हेमाद्रीने आपल्या वाग्भटाच्या टीकेच्या प्रस्तावनेत उल्लेख केला आहे. चक्रदत्त व शिवदाससेन यांच्या चरकावरील टीका बहुधा पूर्णच असाव्या पण त्या मी पाहिलेल्या नसल्यामुळे मला त्याविषयी खात्रीने लिहिता येत नाहीं. वरील दोन तीन टीकांशिवाय, पतंजलीचे एक चरकावर भाष्य होते, हे वर आलेलेच आहे. षड् भिषक् संहिता व इतर वैद्यकसंहिता. अग्निवेशादिकांच्या संहिता पैकीं भेडाची तेवढी संहिता हल्ली तंजावरच्या दबरीं पुस्तकालयांत ( palace Lidarary ) मिळते. अरुणदत्ताचे वेळी धन्वंतरिसंहिता, काश्यपसंहिता, निमि ऊर्फ विदेहतंत्र व पराशर संहिता या उपलब्ध होत्या ( पृ. ५७३ मध्यें अरुणदत्ताने पराशरसंहितेचा याप्रमाणे उल्लेख केलेला आहे. * तथाच पराशरोऽष्टरात्रेणानं परिणमति, शुक्रद य तीति संजगावं' असे ह्मणून पुढे त्यांतील उतारे दिलेले आहेत. असो. सध्या फक्त एकेच ठिकाणी भेडसंहिता तेवढी मिळते.बाकीच्या आर्षग्रंथांपैकी एकही ग्रंथ आज उपलब्ध नाहीं. धन्वंतरीच्या परंपरेपैकीं औपधेनव, औरश्र, पौष्कलावत व सुश्रुत या संहितां पैकी फक्त शेवटची तेवढी उपलब्ध आहे. धन्वंतरी संहिता ह्यणून एक ग्रंथ वेंकटेश्वर प्रेसने छापलेला आहे पण तो अस्सल ग्रंथ आहे की, नाहीं हें मी पाहिलेला नसल्यामुळे सांगू शकत नाहीं याप्रकारे शक्य तेवढा आर्यवैद्यकाचा इतिहास दिलेला आहे. याशिवाय ऋषकाळच्या १८ संहिता कित्येक