पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/181

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७४ | भारतीय रसायनशास्त्र [ प्रकरण श्रीहर्ष राजाने रचिलें अशी प्रासीद्ध आहे. हा दृढबलाचा चरकसंहितेवरचा संस्कार वाग्भटासही माहीत असावा, असे मानण्यास बरीच कारणे आहेत पण चरकसंहितेवर इ. पू. १५ च्या सुमारच्या पतंजलीने भाष्य केलें। १ ते हल्लीं उपब्ध नाहीं ) त्यांत दृढबलाच्या भागावरही ते होते की नाहीं हेही कळण्यास कांहीं साधन नाहीं तथापि दृढबल हा ग्रंथकारही बराच प्राचीन तर दिसतो. चरकसंहिता सध्या जशी मिळते तशी ह्मणजे दृढबलाच्या मजकुरासह–इ. पू. ६०० च्या पूर्वीच तयार झालेली होती असे प्रो. रॉय वगैरे विद्वानांचे मत आहे. ( History of Hiuduchem. dstry, Vot I, in troiuction ) पहा. सारांश सर्व तन्हांनी इ. पू. ६०० च्या पूर्वी चरकसंहिता संपूर्ण झाली होती. पतंजलि. आतां पतंजलीविषयी थोडासा विचार करू. हा व्याकरण सूत्रावरील योगदर्शन सूत्रकार व चरकसंहितेवरील भाष्यकार होता. चरक संहितेवर पतंजलीने एखादें भाष्य लिहिले होते. यास खालील वाक्य प्रमाण आहेः( नागेश भट्टाची परमलघु मंजूषा )

  • आप्नो नाम, अनुभवेन वस्तुतत्वस्य कात्स्यें न नश्चयवान् रागादिवशापि नान्यथावादी यः स इति चरकेपतंजलिः ॥' असो हे तिन्ही ग्रंथकार पतंजली एकच होते हे दर्शविणारा खालील श्लोक केव्हा केव्हां व्याकरण महाभाष्याच्या प्रारंभी आढळतो.

योगेन चित्तस्य, पदेन वाचा । मलं शरीरस्य तु वैद्यकेन ॥ योऽपाकरोत्तं प्रवरं मुनीनां । पतंजलिं प्रांजलि रानतोऽस्मि ॥ १ ॥ या श्लोकावरून परंपरेने पाहतां, योगसूत्रकार व्याकरण महाभाष्यकार, व चरकसंहितेवरील भाष्यकार पतंजलि एकच असावा असे वाटते, याचा काळ व्याकरण महाभाष्या वरून इ. पू. १५० हा ठरविला आहे. चरकसंहितेवर जे पतंजलीने भाष्य लिहिले त * हल्ली उपलब्ध असलेल्या चरकसंहितेत' च समाविष्ट नसून, तो भाष्यरूप ग्रंथ स्वतंत्रच होता