पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/180

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३७ वे ] आयवैद्य ३७ वे ] आयवैद्यकाचा इतिहास १७३ पिढीस २०-२२ वर्षांचा अवकाश दिला तर या काळांत ३०x२०=६०० ६५० वर्षांचे अंतर पडते. भारतीय युद्धाचा काळ आपण १२०० ते १६०० इ. पू धरिला आहे. त्यावरून रामायण काळ १८०० ते २००० इ. पू. ठरेल सामान्यतः इ. पू. २८०० हाच खालचा काळ आपण धरूं, हे ऐतिहासिक काळ आहेत. | वरील सर्व विवेचनावरून खालील कालगणना ठरतेः-- १ भरद्वाज(व त्याचे शिष्य ) ) रामायणकाळी झाले २ आत्रेय पुनर्वसु (मूलिकावैद्यकाचे प्रवर्तक }} इ. पू. २००० ३ व पुनर्वसूचे शिष्य अग्निवेश्य । (अग्निवेश्यतंत्राचे व एका रामायणाचेही कर्ते) J इ. पू. १८०० १ भेड रामायणकाळ व भारतकाळ यांच्या दरम्यान, २ जातूकण्र्य ! या संहिता निर्माण झाल्या. यांचा काळ ३ पराशर इ. पू. १८०० । ४ हारीत । ५ क्षारपाणि । ० कठ ( काठकसंहितेचा कर्ता ) ... इ. पू. १२००च्या पूर्वी. १ चरक( चरकसंहिताकार व याजुष-? .... इ. पू. सुमारे १००० ते शाखाप्रवर्तक ) ११०० १ दृढबल—चरकाचा संस्कर्ता- इ. पू. ६००-७०० याप्रमाणे अग्निवेश्य व चरक यांच्या काळाविषयी विचार केल्यानंतर चरकावर संस्कार करणारा दृढबल किती प्राचीन असावा, या विषयींही विचार करूं. वाग्भटावरचा टीकाकार अरुणदत्त हा या दृढबलाचा उल्लेख कारितो. [ कुंटे यांची वाग्भटाची प्रत, ( सर्वांगसुंदरा टीकेसह ) पहा. पृ. ५७१ ] अरुणदत्त तेथे ह्मणतोः-तथा चरकसंहितायां दृढबलोऽप्याह ! यावरून दृढबल हा अरुणदत्ताहून प्राचीन तर आहे हे उघड होते अरुणदत्त हा ( पृष्ठ ६१४ ) मध्ये नागानंदनाटकाचा उल्लेख करीत असल्या मुळे तो इ. स. ६४० नंतरचाच असला पाहिजे, कारण नागानंदनाटक किंवा २००० ।--इ. पू. १२०० h