पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/179

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७३ भारतीय रसायनशास्त्र, [ प्रकरण काळ भारतीययुद्धानंतर बहुधा लवकरच ठरतो. भारतीय युद्धाचा काळ ऐतिहासिक दृष्ट्या इ. पू. १२००-ते-१५०० च्या सुमाराचा आहे. आपण कमीत कमी १२०० इ. पू. हाच जरी भारतीय युद्धाचा काळ धारिला तरी, त्यानंतर १००-१५० वर्षांनंतर चरकमुनि होऊन गेले असावेत. पाणिनीच्या काळावरूनही चरकाचा काळ हाच ठरतो. पाणनीचा काळ इ.पू. ८०० च्या सुमाराचा असावा असे प्रो. भांडारकर प्रभृति मंडळींचे मत आहे. चरक पाणिनीचे पूर्वी दोनतीनशे वर्षे होऊन गेला असावा हे मागे आह्मीं दाखविलेलेच आहे. यावरून चरक इ. पू. १०००-११०० वर्षाच्या सुमारास होऊन गेला हे कळून येईल, । चरकाचा याप्रकारे अनेक प्रमाणावरून काळ ठरविल्यानंतर भरद्वाज, पुनर्वसु आत्रेय अग्निवेश यांचे काळ ठरवितां येतात की काय, हे आपण पाहू. भरद्वाज, व पुनर्वसु आत्रेय हे बहुधा रामायणकालीन ऋषि असावेत, असे वर सुचविलेलेच आहे. महाभारतांत वैद्यकाचा प्रवर्तक ह्मणून कृष्णात्रेयाचा उल्लेख आढळतो. शिवाय, या आत्रेयाचा शिष्य अग्निवेश हा रामायणकालीन होता, यास दुसरेही प्रमाण आढळते. ते असे कीं रामायणाच्या युद्धकांडांतील ‘ रामतिलक' टीकेंत अग्निवेश्यकृत रामायणा' चे उतारे दिलेले आहेत. ते उतारे पाहतां तत्कालीन ग्रंथकाराखेरीज इतरांस तसे रामायण लिहिणे शक्यच नाहीं हे कळून येईल; कारण त्यांत, रामाच्या वनवासाची बरोबर रोजनिशी दिलेली असून, शिवाय, रामायणांचे युद्ध बरोबर ७२ च दिवस सारखें कसे झाले, व सीतेचा रामाशीं बरोबर किती दिवस विरह झालेला होता, ही सविइतर माहिती तत्कालीन ग्रंथकाराखेरीज इतरांस देतां येणे शक्यच नाहीं. शिवाय, ही माहिती खरी आहे, यास पद्मपुराणांतील लोमशरामायणाची । साक्ष आहे. हे लोमशऋषि रामायणकाळीच होते, असे येथे स्पष्ट झटले ३ असे. यावरून आग्नवेश्य, ( पुनर्वसु आत्रेयाचे शिष्य ), हे बहुधा एका रामायणाचे कर्ते व तत्कालीन होते, या बद्दल शंका दिसून येते हानीं, रामायणकाळ व भारतकाळ यांत ३० पि । अंतर आहे. प्रत्य