पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/178

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३७ वें] आर्यवैद्यकाचा इतिहास. १७१ यांत शंका दिसत नाहीं; कारण इतर ठिकाणीं संस्कृत वाङ्मयांत जातूकर्ण्य पराशर, व व्यास हे क्रमाने वंशोक्त ऋषीमध्ये येत असतात यावरून पाहतां, चरकमुनि हे जातूकण्य व पराशर यांनंतर ब-याच काळाने झालेले दिसतात. यास दुसरेही प्रत्यंतर पुरावे आहेत. * कठचरकाक्' असे पाणिनीचे सूत्र आहे ( ४-३-१०७ ) यावरून कोणीं एक चरक पाणिनीचे पूर्वी होऊन गेला हे सिद्ध होते; परंतु यांतील कठ व चरक हे याजुषशाखेचे प्रवर्तक असून, यांतील चरकाचे, वैद्यकीय चरकाशी ऐक्य ठरविण्यास अवांतर प्रमाणे पाहिजेत. या सूत्रावर जयादित्याने जी काशिकावृत्तींत टीका केलेली आहे, तींत 4 चरकाचे वैदिक ग्रंथ व श्लोकग्रंथ " असे शब्द येतात, व पाणिनीय सूत्रांवरील अ. ४२-६६ व अ. ४-३-१०२ या ठिकाणच्या टीकेवरूनही वैदिकग्रंथांचा व श्लोकग्रंथांचा कर्ता कोणी एक चरक होता असे कळून येते; व ज्या अर्थी ह्या वैदिक शाखाप्रवर्तक चरकांचा दुसरा कोणताही ** श्लोकमय ग्रंथ उपलब्ध नाही, त्या अर्थी ही जी वैद्यकीय संहिता तीच वरील चरकाचा श्लोकग्रंथ असावा असे वाटणे सहाजिक आहे. अनुमान हे बरोबर असल्यास चरक हा पाणिनीहून निदान दोन तीनशे वर्षांमागे होऊन गेल्याचे कळून येईल. पाणिनीने वैदिकग्रंथकार ह्मणून कठ व चरक यांचा मिळून उल्लेख केलेला आहे यावरून कठ व चरक हे समकालीन तरी असतील किंवा कठ हा चरकाहून प्राचीनतर तरी असेल, असे वाटते. यापैकी कोणतीही गोष्ट सिद्ध धरिली तरी त्यायोगें चरकाचा काळ ठरविता येतो. कठाची जी काठकसंहिता आहे, त्यांत धृतराष्ट्र व विचित्रवीर्य या भरतकालीन व्यक्तींचा उल्लेख आहे. यावरून कठ हा धृतराष्ट्र व विचित्रवीर्य यांच्यानंतर पण भारतीय युद्धापूर्वी ( बहुधा ) होऊन गेलेला असावा; चरक त्याचा समकालीन किंवा बहुधा त्यानंतरचा असल्यामुळे तो भारतीय युद्धानंतरच झाला असला पाहिजे; वे ही अनुमाने आह्मीं मागें, जातूकण्र्य व पराशर यांच्या संहिता चरकास माहीत होत्या यावरून काढिलेलीच आहेत. यावरून चरकमुनींचा