पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/177

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७० भारतीय रसायनशास्त्र, | [ प्रकरण पुनर्वसु आत्रेय हे रामायणाच्या काळीच होऊन गेले, असे अनुमान निघेल, पुनर्वसु आत्रेय हे जर रामायणकालीन असतील, तर त्यांचा पट्टाशष्य आग्नवेश हाही पण तत्कालीन असू शकेल, पण बाकीचे संहिताकार भेड, जातुकण्यं पराशर, हारीत, व क्षारपााण हे पुनर्वसु । आत्रेयांचे साक्षात् शिष्य होते की नाहीं ( चरक लिहितो त्याप्रमाणे ) याची मोठी शंका आहे. भेडाचे नांव संस्कृत वाङ्मयांत दुसरें कोठे ऐकू येत नाहीं तेव्हां त्याची गोष्ट सोडून देऊ पण जातूकण्य व पराशर हे मात्र भारतकालीन ऋषि होते यांत शंकाच नाहीं. हारीत मात्र कदाचित् प्राचीन तर असेल, पण सध्या हारीताच्या नांवाने मिळणारा ग्रंथ मात्र अस्सल हारीताचां ग्रंथ नव्हे; संग्रहरूपग्रंथ आहे.(तेव्हां क्षारपाणचे नांव तेदुसरीकडे आढळत नाहीं) जीतूकण्र्य व पराशर यांच्या संबंधानें तरी खात्रीने सांगत येते की ते भारतकालीन ऋषि असल्यामुळे, पुनर्वसु आत्रेयाचे साक्षात् शिष्य, चरक ह्मणते त्याप्रमाणे, ते असू शकणार नाहींत यावरून असे कळून येईल, की अग्निवेश हा पुनर्वसु आत्रेयाचा अस्सल शिष्य व त्या काळचा दिसतो. बाकीच्या पांच संहिता भेड, जातृकण्ये, पराशर, हारीत व । क्षारपाण या अग्निवेश व चरक या दोघांच्या काळाच्या दरम्यान निर्माण झाल्या असाव्यात. अग्निवेशाबरोरच त्यांनी आपले ग्रंथ लिहिलेले असणे बहुधा शक्य दिसत नाहींत. चरकाची मात्र अशी समजूत होती कीं अग्निवेशाप्रमाणेच बाकीचे पांच ग्रंथकारही पुनर्वसु आत्रेयाचे साक्षात् शिष्य असावेत, ते कांहीं असो. एवढे मात्र खास की चरकमुनींच्या पर्वी या साही संहिता निर्माण झालेल्या होत्या, व त्या ब-याच प्रसिद्ध होत्या यावरून चरकाचा काळ. आपणांस अनुमानानें काढिता येईल. तो कसा ते पहा. वरील सहा जसंहितांपैकीं जातूकण्ये व पराशर यांच्या संहिता ज्या अर्थी चरकमनीस माहीत होत्या, त्या अर्थी पराशर व जातुकर्ण्य यांनंतर ब-याच काळानंतर चरकमुनि झालेले असावेत. हे पराशर व्यासाचे वडीलच होत