पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/176

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३७ वे ] १६९ प्रकर प्रकरण ३७ वें. * आर्यवैद्यकाचा इतिहास. * डॉ. गर्दे यांनी आपल्या वाग्भटाच्या प्रतीच्या प्रस्तावनेत आर्यवैद्यकाच्या इतिहासाविषयी बहुतेक चर्चा केलेली असून ती पुष्कळ अंशीं समाधानकारक आहे; तथापि, कांहीं अधिक माहितीची भर घालून मींही याविषयींची थोडीशी चर्चा करितों. ही चर्चा डॉ० गर्दे यांच्या माहितीस पुरवणीदाखल आहे, हे कोणासही कळून येईल. या इतिहासांत मी फक्त आत्रेय पुनर्वसु धन्वंतरि इत्यादि आर्षपरंपरेचाच विचार केलेला आहे. रसवैद्यकाच्या परंपरेसंबंधाने प्रस्तुत ग्रंथांत माहिती दिलेली असून या बाबतीत मात्र डॉ० गर्दै यांची मते बरीच कच्ची व चुकीची आहेत हे वाचकांच्या उघडकीस येईल. याबद्दल त्यांस दोषमात्र देता येत नाहीं; कारण त्यावेळी त्याबद्दल तेवढीच माहिती होती. चरकसंहिता, सध्या आपल्याला चरकसंहिता ह्मणून जी मिळत आहे तीच सर्वांत प्राचीन ग्रंथ आहे. पण ती एकाची कृति नसून, तींत निदान तिघांचा तरी हात आहे. यामुळे प्रत्येकाच्या काळाचा विचार स्वतंत्रपणे करावा लागतो. ( १ ) मूळचे आग्नवेशाचे तंत्र; ( २ ) त्यावरचा चरकमुनींचा संस्कार. (३) त्यावरचा दृढबलाचा संस्कार. याप्रकारे तीन ग्रंथकारांचा हात या ग्रंथावर फिरलेला आहे. | अग्निवेशादिकांचा काळ, आतां भरद्वाज ( ज्याला इंद्राकडून आयुर्वेदाचे थोडेबहुत ज्ञान प्राप्त झाले, पण ज्याचा आज ग्रंथ एकही उपलब्ध नाहीं ) पुनर्वसु, आत्रेय याचा पिता अत्रि, व पुनर्वसु आत्रेय यांचे आग्नवेश, भेड, जातुकर्य, पराशर, हारीत, क्षारपाणि इत्यादि शिष्य यांचा काळ ठरविणे बरेच कठिण दिसते. भरद्वाज व अत्रि या रामायणकालीन व्यक्ति असतील, तर २२