पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[प्रकरण
भारतीय रसायनशास्त्र



तत्र देवि! स्थिरं पिंडं पिंडस्थैर्ये रसः प्रभुः ॥
अचिराज्जायते देवि! शरीरमजरामरम् ॥ २१ ॥
मनसश्च समाधानं रसयोगादवाप्यते ॥ २२ ॥
तस्य मंत्राश्च सिध्यंति यो अत्ति मृतसूतकम् ॥
स्वदेहखेचरत्वं च शिवत्वं येन लभ्यते ॥ ३१ ॥
तादृशे तु रसज्ञाने नित्याभ्यासं कुरु प्रिये ॥

 मनाचे समाधान, मंत्रसिद्धि, खेचरीसिद्धि, शिवतादात्म्य व जीवन्मुक्ति इतकी ज्या रसयोगाने साधतात, तो कर्मयोगांत श्रेष्ठ कसा नव्हे बरे? जीवन्मुक्ति मिळविण्यासाठी प्रथम देहस्थैर्य बनविले पाहिजे. रसार्णवकारांनीं रसयोगाचे महत्व दाखवितेवेळीं, पवनयोगानें ( प्राणायामादिक योगानें ) व मंत्रयोगाने पिंडस्थैर्य प्राप्त होत नाही, असे म्हटले आहे. याच शरीरांत भुक्ति व मुक्ति मिळवावयाची असल्यास रसविद्येचा अभ्यास करा, असा एकंदरीत मथितार्थ आहे. रसहृदयकार श्रीमद्गोविंदपूज्यपाद यांनीही याच कल्पना खालील आर्यात फारच उत्कृष्ट तऱ्हेने गोंविलेल्या आहेत. रसहृदयाच्या पहिल्या अवबोधांतील बहुतेक आर्या रसरत्नसमुच्चयकाराने व माधवाचार्याने ( रसेश्वरदर्शनांत ) उतरून घेतलेल्या आहेत. त्या अत्यंत गोड व श्रीशंकराचार्यांच्या गुरूंना शोभण्यासारख्या आहेत ह्मणून येथे देऊन ठेवितों.

  • मूर्छित्वा हरति रुजं, बंधनमनुभूय मुक्तिदो भवति ॥

अमरीकरोति सुमृतः, कोन्यः करुणापरः सूतात् ॥ ३ ॥
सुरगुरुगोद्विजहिंसापापकलापोद्भवं किलासाध्यं ॥
तदपि च शमयति यस्मात्कोन्यस्तस्मात्पवित्रतरः ॥ ४ ॥
रसबंधश्च स धन्यः प्रारंभे यस्य सततमिव करुणा ॥
सिद्धे रसे करिष्ये महीमहं निर्जरामरणम् ॥ ६ ॥
ये चात्यक्तशरीराः हरगौरीसृष्टिजां तनुं प्राप्ताः ॥
वंद्यास्ते रससिद्धाः मंत्रगणाः किंकरा येषाम् ॥ ७ ॥
सुकृतफलं तावदिंद, सुकुले यज्जन्म, धीः स्वतंत्राѕपि ॥
सापि च सकलमहीतलतुलनकला; भूतलं च सुविधेयं ॥ ८॥ ।।


* हे मूळ चार प्रतीवरून शुद्ध करून योग्य असेल तो पाठच येथे दिला आहे.रसरत्नसमुच्चय,  रसेश्वरदर्शन व रसहृदयाच्या दोन प्रती यांवरून मूळ दिले आहे.