पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३ रे.]
 



प्रकरण ३ रे
रसविद्या व जीवन्मुक्ति
__________________

 रसवाद्यांपुढें ध्येय हें असें की, "सिद्धे रसे करिष्ये निर्दारिद्र्यगदं जगत्" ह्मणजे रस सिद्ध झाला असतां सर्व जगत् दारिद्र्य व रोग यांजपासून मुक्त करीन. एवढाच त्यांचा हेतु नव्हता. जीवन्मुक्ति मिळविणे हाही एक त्यांचा अंतिम-हेतु असे. जीवन्मुक्ति साधावी ह्मणून पिंडस्थैर्य बनवावयाचे; हे पिंडस्थैर्य रसविद्येने होते. ह्मणून रसवाद्यांपुढे लोहसिद्धि, देहसिद्धि व जीवन्मुक्ति हे तीन विषय असत. रसार्णवाच्या प्रारंभाच्या भागांत शिव पार्वतीस सांगतात की:-

अजरामरदेहस्य शिवतादात्म्यवेदनम् ॥
जीवन्मुक्तिर्महादेवि! देवानामपि दुर्लभा ॥ ८ ॥
पिंडपाते तु यो मोक्षो सं च मोक्षो निरर्थकः ॥ ९ ॥

* * * *

तस्मात्तं रक्षयेत्पिंडं रसैश्चैव रसायनैः ॥
षड्दर्शनेऽपि मुक्तिस्तु दर्शिता पिंडपातने ॥
करामलकवत्सापि प्रत्यक्षं नोपलभ्यते ॥ १२ ॥
शून्यध्यायी मंत्रजापी न पिंडं धारयेत्क्वचित् ॥ १४ ॥
तेन पिंडो महाभागे रक्षणीयः प्रयत्नतः ॥ १७ ॥

 पिंडरक्षणाचे उपाय दोन प्रकारचे सांगितलेले आहेत. एक, रसयोग; व दुसरा, पवनयोग. या प्रकारे कर्मयोग दोन प्रकारचा आहे. कर्मयोगाने पिंडधारणा होते.

कर्मयोगेन देवेशि! प्राप्यते पिंडधारणम् ॥ १८ ॥
रसश्च पवनश्चैव कर्मयोगो द्विधा मतः ।।
*मूर्छितो हरति व्याधिं मृतो जीवयति स्वयम् ॥ १९ ॥
बद्धश्च खेचरः कुर्यात् रसो वायुश्च भैरवि! ॥
ज्ञानान्मोक्षः सुरेशानि. झानं पवनधारणात् ॥ २० ॥


* हाच श्लोक रसेश्वरदर्शनांत व हठयोगप्रदीपिकेत उतरून घेतला आहे.