पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/167

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६० भारतीय रसायनशास्त्र [ प्रकरण पारदो गदितो यस्मात् परार्थ साधकोत्तमैः । । सुतेऽयं मत्समो देव. २म प्रत्यंगसंभवः ॥ मम देसोबत्राद्रसस्तेनायम्मुच्यते ॥ प्रकारांतरांनी जीवन्मुक्षीघी युक्ति लभ्य असतां ही शाब्दिक युक्ति कांहीं बरोबर नाही असे कोणी म्हटल्यास ते योग्य नव्हे; कारण सहाही , दर्शनांमध्ये देहपातानंतरच मुक्ति सांगितलेली असल्यामुळे, त्यावर विश्वास न उत्पन्न होतां, संशय घेण्याची प्रवाते नष्ट होत नाही. याविषयीही तेथेच ( रसाणवांत ) लिहिलेले आहेः घदनेऽपि मुक्तिस्तु दर्शिता पिंडपातने। कराक्षलत्सापि प्रत्यक्षा नोपलभ्यते । तस्मात्तं रक्षयेत्पिड़े रसैश्चैव रसायनैः। ( अर्थः-सहाही दर्शनांमधून पिंडपातनानंतर मुक्ति दाखविलेली आहे; हातावरील आंवळ्याप्रमाणे ती प्रत्यक्ष मिळत नाही. ह्मणून हे (7) शरीर रस व रसायने यांनी राखुन ठेवावे. ) गोविंदभगवत्पादाचायनी देखील ( ह्मटले आहे कीं:-) इति धनशरीर भोगान् मत्वाऽनित्यान् सदैव यतनयिम् । मुक्तौ; साच झानात; तच्चाऽभ्यासात; सच स्थिरे देहे ॥ | ( अर्थः-याप्रकारें धन, शरीर व भोग हे अनित्य मानून नेहमी मुक्तीविषयी प्रयत्न करावा, ती मुक्ती ज्ञानाने प्राप्त होते. ज्ञान अभ्यासाने मिळते व अभ्यास देह स्थिर असतां घडतो. ) क्षणभंगुर ह्मणून दिसून येत असलेल्या शरीराला नित्यत्व कसे येई. ल असे वाटत असेल तर तसे वाटू देऊ नकोस. सहा कौशांचे हैं शरीर, घरी आनत्य आहे, तरी रस व अभ्रक या पदांनी सांगितल्या जाणा च्या हरगोरीमृष्टीने उत्पन्न झालेलें ( शरीर ) नित्य होते असा - येतो. ( रसाभ्रकपदाभिलप्य हरगौरीसृष्टिजातस्य ( शरीरस्य) नित्यस्वोपपत्तैः ). तसेंच रसत्वदयांत ( ह्मदले आहे की ):--