पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/166

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३६ वें] पाश्चात्यांतील रसविद्या. १५९ व ४००।५०० वर्षापूर्वी एकदा असे दोन केळां भारतखंडांतून रसविद्येच, झरा पाश्चात्य देशांत वाहत गेलेला आहे. या झ-यांतच बर्नहार्डस रससिद्धाने आपली तहान भागवून घेतल्याचा स्पष्टउल्लेख आम्ही दिलेलाच आहे. असो. याप्रकारे एके काळीं मारतवर्ष हे या रसविद्येचे माहेरघर होते. प्रकरण ३६ चें. रसेश्वरदर्शन. * - - --- माधवाचार्याच्या सर्वदर्शनसंग्रहामधील नववे प्रकरण म्हणजे रसैश्वरदर्शन ' होय. माधवाचायच्या वेळी ( सुमारे १३५० ) भरतखंडांत प्राचीन म्हणून कोणकोणते रसग्रंथकार समजले जात असत, याची माहिती समजण्यासाठी मी खाली रसेश्वरदर्शनाचे भाषांतर देतो. त्यांत उतारे तसेच ठेविले असून त्यांचेही भाषांतर केलेले आहे.

  • दुसर माहेश्वर परमेश्वरतादात्म्य ( करून घ्यावे असे ) म्हणत असतांही, पिंडस्थैर्य नसतां सर्वांना आवडणारी जीवन्मुक्तीस खंड पडेल असे समजून, पिंडस्थर्याचा उपाय, पारदाई पदांनी जाणला जाणारा रसच आहे असे सांगतात. संसार सागराच्या परतीराला नेऊन पोंचवितो म्हणून रसाला पारद ह्मणतात; याविषयी म्हटलेले आहे कीः
  • संसारस्य परं पारं दते ऽ सौ पारदः स्मृतः अर्थ संसारांतून पलीकडे नेऊन पोचवितो म्हणून यास पारद म्हणतात रसार्णवांत देखील म्हटले आहे कीं:-
  • हा श्लोकाध माधवाचार्यांनी, नित्यनाथांच्या रसरत्नाकर वादखंड, प्रथम पदेशांतील ( श्लो.५ ) घेतलेला आहे.