पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५६ भारतीय रसायनशास्त्र [ प्रकरण red colour. वरील देशांत तांबडा पारद * मिळतो असे यावरून दिसते, जर्मनी देशांत जरी हा पदार्थ मिळते तरी तो वरील देशांतल्या इतका चांगला नसतो. थिऑफ़ास्टस चे असे मत आहे किं जर्मनीदेशांत ‘सिद्धरसहारे आयताच मिळतो. इस्ट्रिया ! कांडिया, हंगेरी व स्पेन येथील पारा व हिंगुळ चांगला असे पाश्चात्यांचे मत आहे. पाश्चात्य रसविद्येत ज्यारणादि संस्कारांना खालील शब्द आहेतः--- जारणा Coction; Digestion; Fermentation. सारणा Incorporation, क्रामणा Ingression. बेध Projection रंजन Tinging; coluring. | पारद व हिंगुळ हे पर्दाथ मूळ इकडचे नव्हेत असे कित्येकांचे मत असल्यामुळे, ही रसविद्याही परदेशची इकडे आलेली असावी असे त्याच मत आहे; पण हिंदुस्थानांत अद्यापि पारा मिळत असल्याबद्दल आम्ही पाश्चात्य शोधकांचीच एक साक्ष दुसरीकडे दिलेली आहे. शिवाय, जशी हिंदुस्थानांत, तशीच इतर देशांतही ही विद्या माहीत असल्याबद्दळ वाचस्पतिमिश्रयाने आपल्या योगभाष्यावरील टीकेंत भ्हटले आहे. कैवल्यपादांतील पहिले सूत्र में 4 जन्मौषधि तपः समाधिजाः सिद्धयः॥ यांतील औषध शब्दावर व्यासाची टीका अशी आहे. औषधिाभिः असुरभवनेषु रसायनेनेति । यावर वाचस्पतिमिश्राची अशा टीका आहेः औषधिसिद्धिमाह असुरभवनेविति । मनुष्या हि कुतश्चिनिमित्ताद सुर भवनमुपसंप्राप्तः कमनीयाभिरसुर कन्याभि: उपनीतं रसायनमुपयुज्य अजरामरणवमन्याश्चासद्धारासादयति ।इहैव वा रसायनो पयागेन। यथा मांडत्यो

  • तांबड्या पा-याविषयां, भारतीय रसायनशास्त्र, पृष्ट १२५॥१२६ पहा. तेथे 'रस' हा तांबड़ा असतो असे म्हटलेलें आहे.